Mnoj Jarange: राज्यात सध्या मराठा आरक्षणावरून वातावरण तापल्याचे दिसत असताना आज मनोज जरांगे यांनी त्यांच्या वाढदिवसादिवशी देहदानाचा संकल्प केला आहे. मृत्यूनंतर केवळ तळपाय आणि हात सोडून माझे सर्व अवयव दान व्हावेत. माझ्यावर सरकारने जीवघेणे हल्ले केले तरी मी मागे हटणार नाही असे सांगत विधानसभेत हिस्का दाखवायची वेळ आली तर एकही निवडून द्यायचा नाही असे जरांगे म्हणाले. मराठा समाजारचे भविष्य धोक्यात घालून मी सरकारचे पाय चाटू शकत नाही. मी मॅनेज होऊन पैसा, पद मिळवायचं नाही असं म्हणत जरांगेंनी मराठा समाजाला भाऊक साद घातली.
मनोज जरांगे यांचा आज वाढदिवस असल्याने जालन्यातील आंतरवली सराटीत मराठा कार्यकर्त्यांसह ते माध्यमांशी बोलत होते. यावेळी वाढदिवस आनंदाचा असल्याचे सांगत मी माझं आयुष्य समाजासाठी देणं आहे. माझ्या मृत्यूनंतर माझे देहदान करण्याचा संकल्प असल्याचं जरांगे म्हणाले. मृत्यूनंतर केवळ हात आणि तळपाय सोडून माझे सर्व अवयवदान व्हावेत. मी माझ्या मनाने निर्णय घेतलाय. त्याचे काय नियम असतात मला माहित नाही. असे जरांगे म्हणाले.
जीवघेणे हल्ले केले तरी मागे हटणार नाही
मराठ्यांचे लेकरं मोठे व्हावेत म्हणून त्यांना आरक्षण हवंय. टपरी, हॉटेल, रिक्षा चालवणाऱ्यांची मुलं मोठी व्हावीत म्हणून माझा संघर्ष सुरु आहे. वेदना सांगून नीट होणार नाही . म्हणून मी सांगत नाही असे म्हणत जरांगेंनी माझ्यावर जीवघेणे हल्ले सरकार ने केले तरी मी मागे हटणार नाही. मला भीती काय असते माहिती नाही, मला आपलेच बांधव म्हणतात तुम्ही सांभाळून राहिले पाहिजे, पण माझ्या शरीराला भीती वाटत नाही ,असंही ते म्हणाले.
रक्ताच्या थारोळ्यात पडलो तरी..
माझी समाजाकडे काही अपेक्षा नाही, अखे सरकार माझ्या मागे लागलाय, विरोधी पक्ष ही माझ्या लागलाय, माझ्यावर जीवघेणा हल्ला. झाला रक्ताच्या थारोळ्यात पडलो तरी माझ्या तोंडावर एकच विषय असेल ते म्हणजे मराठा आरक्षण. असे म्हणत ७ ते १३ ला शांतता रॅलीत सर्व मराठ्यांनी एकत्र यावं असं आवाहन जरांगेंनी केलंय.
विधानसभेत हिसका दाखवायची वेळी आली
विधासभेत हिसका दाखवायची वेळ आली तर एकही निवडून द्यायचा नाही, आणि आपण एक जरी उभा करायचं ठरवले तर त्याच्याशी मतभेद असेल तरी त्याला साथ द्यायची, मराठ्यांनी आता गाव आणि शहरात टप्प्या टप्प्याने बैठका घेणे सुरू करा, पडायचा असो की उभे करण्याचा निर्णय असो, ताकदीने उभे राहायचे.