Amol Mitkari Vs MNS: राज्यात सध्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसे पदाधिकाऱ्यांमध्ये चांगलाच वाद झाल्याचे पाहायला मिळाले. अकोल्यातील शासकीय विश्रामगृहाबाहेर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांची कार मनसे कार्यकर्त्यांनी फोडल्यानंतर मोठा राडा झाला. या प्रकारानंतर मनसेचे सरचिटणीस कर्णबळा दूनबळे(Karnabala Dunbale) आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची भेट घेण्यासाठी येणार आहेत. अकोल्यातील झालेल्या प्रकारानंतर ते ठाकरेंच्या भेटीला येणार आहेत. या भेटीनंतर तरी अमोल मिटकरी vs मनसे वादावर पडदा पडणार का? हे महत्वाचं ठरणार आहे.


दरम्यान, अमोल मिटकरी यांनी अकोल्यात पोलीस अधिक्षक कार्यालयात आमदार अमोल मिटकरींचं मुलीसह ठिय्या आंदोलन सुरु केलंय.अकोल्यातील राडा प्रकरणात आमदार अमोल मिटकरी अकोला पोलिसांवर प्रचंड नाराज असून गुन्हा दाखल झालेल्या 13 पैकी 3 आरोपींना जामीन झाल्याने हा वाद आणखी चिघडण्याची शक्यता निर्माण झालीये.  


कर्नबळा दुबळेंचं मिटकरींना ओपन चॅलेंज


आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांना माझं ओपन चॅलेज आहे. पोलिस सुरक्षा बाजूला कर, मी समोर येतो अन् एकदा काय ते होऊनच जाऊ दे, असा थेट आव्हान मनसे सरचिटणीस कर्णबाळा दुनबळे अमोल मिटकारींना दिलं होतं. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी राज ठाकरेंवर  केलेल्या एका वक्तव्याने राज्याचा राजकारणात मोठा वादंग निर्माण झाला आहे.शासकीय विश्रामगृहाबाहेर झालेल्या राड्यानंतर मनसे कार्यकर्त्यांचा मृत्यू झाला होता. दरम्यान कर्नबळा दुनबळे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भेटीला जात असून या  प्रकरणात मनसेकडून काय निर्णय घेतला जाणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.


मिटकरी हे अजित दादांना बुडवल्या शिवाय राहणार नाही- कर्णबाळा दुनबळे


आमदार अमोल मिटकरी हे कोणाबद्दल कधी चांगलं बोलले आहे का? ज्या सुप्रीया ताईंनी त्यांना पक्षात स्थान दिलं, त्यांना यांनी सोडलं नाही. हा माणूस अजित दादांना बुडवल्या शिवाय राहणार नाही. मी उद्या अकोल्यात जातोय. पोलिसांना सर्व सहकार्य करणार. मात्र, राज साहेबांबाबत एकही चुकीची गोष्ट एकूण घेणार नाही. गरज पडल्यास अमोल मिटकरींना जशास तसं उत्तर दिलं जाणार, अशी प्रतिक्रियाही मनसेचे सरचिटणीस कर्णबाळा दुनबळे यांनी दिली.


हेही वाचा:


पोलीस सुरक्षा बाजूला कर, मी समोर येतो एकदा काय ते होऊनच जाऊ दे! मनसे सरचिटणीसांचे अमोल मिटकरींना थेट आव्हान