Jalna news: शरद पवारांना (sharad Pawar) सुप्रीम कोर्टाचा निकाल माहित असायला पाहिजे, अमित शहांना (Amit Shah) तडीपार म्हणणं अयोग्य असल्याचं माजी केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड म्हणालेत. शरद पवारांनी अमित शहांच्या टिकेला दिलेल्या प्रत्युत्तरावर भाजपचे खासदार भागवत कराड (Bhagwat karad) यांनी पवारांवर निशाणा साधलाय.

  


गेल्या काही दिवसात राष्ट्रवादी पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार आणि भाजप नेत्यांमध्ये राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. भाजपचा महासंमेलनात गृहमंत्री अमित शहा यांनी शरद पवारांना भ्रष्टाचाराचे सरदार म्हटल्यानंतर शरद पवारांनी त्यांना जोरदार प्रत्युत्तर देत अमित शहांना सर्वोच्च न्यायालयाने तडीपार केल्याची टीका केली होती. यावर आता भागवत कराड यांनी जालन्यातून प्रतिक्रिया दिलीय.


शरद पवारांचे विधान अयोग्य 


शरद पवारांनी अमित शहा यांच्यावर केलेली टीका चुकीची असून सुप्रीम कोर्टाचा निकाल शरद पवारांना माहीत असायला पाहिजे होता असे म्हणत पवारांचे विधान अयोग्य असल्याचे खासदार माजी केंद्रीय मंत्री डॉक्टर भागवत कराड यांनी म्हटलंय.


मराठा ओबीसी आरक्षणावर भाजप ठाम 


दरम्यान ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही भाजपची भूमिका आहे. भाजप ओबीसींनादेखील न्याय देणारा पक्ष असल्याचे भागवत कराड यांनी सांगितले. 


मागील काही दिवसांपासून मराठा आणि ओबीसी आरक्षणावर शरद पवारांनी भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी होत असताना भागवत कराड यांनी मराठा ओबीसी आरक्षणावर भाजप ठाम असल्याचे सांगितले. 


आंबेडकरांच्या विधानांची सहमत नाही 


दरम्यान प्रकाश आंबेडकरांनी फडणवीस आणि जरांगे भांडणाचं नाटक करत असल्याची टीका केल्यानंतर या विधानांवर मी सहमत नाही असे उत्तर भागवत कराड यांनी दिले आहे. 


मराठा आरक्षणात प्रश्नावर मनोज जरांगे पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांचे खायचे दात वेगळे आहेत आणि दाखवायचे दात वेगळे आहेत असा आरोप वंचित चे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केला होता. यावर मी सहमत नसल्याची प्रतिक्रिया भागवत कराड यांनी दिली.


भाजप कुठेही जरांगे पाटील यांच्या भूमिकेला विरोध करत नाहीत


राजकारण समजून घ्या, जरांगे पाटील आणि देवेंद्र फडणवीस याचे भांडण नकली आहे असं सांगत प्रकाश आंबेडकर म्हणाले की, भाजपाने ओबीसी विरोधात भूमिका घेतली आणि जरांगे पाटील यांनी फडणवीस यांना विरोध केला तरच हे भांडण खरं आहे हे समजून घेऊ. अन्यथा हे नकली भांडण असेल. 


भाजपने जरांगे पाटील यांच्या मागणीला कधीच विरोध केला नाही असा दावा प्रकाश आंबेडकरांनी केला. ते म्हणाले की, स्वतःला फसवून घेऊ नका. यांचे दाखवायचे आणि खायचे दात एक असेल तर मत मागायला या असे आता भाजपला लोकांनी सांगितले पाहिजे. 


हेही वाचा: