Sadabhau Khot : मराठा समाजाला न्याय देण्याचे काम उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनीच केलं आहे. महाराष्ट्रात मराठा समाजाचे अनेक मुख्यमंत्री झाले पण त्यांनी मराठा समाजाला न्याय दिला नसल्याचे रयत क्रांती संघटनेचे प्रमुख आमदार सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) म्हणाले. शरद पवार (Sharad Pawar) हे चार वेळा मुख्यमंत्री झाले. मराठ्यांचे नेते म्हणून मिरवले. पण मराठा समाजाची त्यांनी मातीच केल्याचे सदाभाऊ खोत म्हणाले. दोनदा मराठा समाजाला आरक्षण देण्याचे काम एकदा देवेंद्र फडणवीस यांनी केलं. दुसऱ्यांदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केल्याचे सदाभाऊ खोत म्हणाले.  


 मनोज जरांगे पाटील यांच्याबरोबर सरकार चर्चा करण्यास तयार


मराठा समाजासाठी आण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळ असेल, सारथी सारखी संस्था असेल त्या माध्यमातून 20 विद्यार्थी युपीएसीमध्ये आले. अशा अनेक योजना मराठा समाजासाठी फडणवीस यांनी केल्या आहेत. त्यामुळं आरक्षणाच्या मुद्यावर राजकीय दृष्टीकोणातून न पाहता, राज्यातील ओबीसी आणि मराठा समाज गुणा गोविद्यांना राहिला पाहिजे असे खोत म्हणाले. मनोज जरांगे पाटील यांना माझी विनंती आहे की, सरकार चर्चेसाठी तयार आहे. कायदे तज्ज्ञांना सोबत घेऊन एक चांगला मार्ग काढू असे सदाभाऊ खोत म्हणाले. हा मार्ग महाराष्ट्राच्या हिताचा असेल असे खोत म्हणाले. कोणतही आंदोलन चालवत असताना सरकार आपल्याशी बोलत नसेल तर आंदोलन आक्रमक करायचे असते, सरकार आपल्याशी बोलत असेल तर संवाद आणि चर्चा करावी असे खोत म्हणाले. यातून मार्ग निघेल असेही खोत म्हणाले.  मी ऊसाचं, दुधाचं, सोयाबीनच आंदोलन केलं, कळवा जेलमध्ये गेलो, येरवाड्यात गेलो, लाठ्या काठ्या खाल्या. पण आंदोलन कुठं थांबवायचं हे जर समजलं तर ज्यांच्यासाठी आंदोलन करतो त्यांना न्याय मिळतो असे सदाभाऊ खोत म्हणाले.  


शेतीच्या बांधावरुन मला विधानभवनाच्या बांधावर उभं केलं


शेतीच्या बांधावरुन मला विधानभवनाच्या बांधावर उभं केलं आहे. मी भाजपसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानतो, असे आमदार सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) म्हणाले. मी सर्व शेतकऱ्यांना न्याय देणार आहे. माझ्या या पदाचा उपयोग हा महाराष्ट्रातील सर्वसामान्य गोरगरीब जनता, कष्टकरी वर्ग आणि माझ्या बळीराजाच्या उन्नतीसाठी करेन असे खोत म्हणाले. विधानपरिषदेच्या सदस्यत्वाची आज सदाभाऊ खोत यांनी शपथ घेतली त्यावेळी ते बोलत होते. 


महत्वाच्या बातम्या:


Sharad Pawar : विधानसभेआधीच मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावणार, शरद पवारांचं शिष्टमंडळाला मोठं आश्वासन