बुलढाणा : राज्यातील अनेक जिल्ह्यात यंदा मे महिन्याच्या शेवटीच मुसळधार (Rain) पावसाने हजेरी लावली. त्यामध्ये, अनेक जिल्ह्यात शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं असून फळबागाही उध्वस्त झाल्याचं पाहायला मिळालं. मात्र, अद्यापही या शेतकऱ्यांना कुठलीही मदत शासनाकडून मिळाली नाही. प्रशासनाने पंचनामे केले असले तरी मदत न मिळाल्याने शेतकरी (Farmer) सातत्याने मदतीची मागणी करत आहेत. लोकप्रतिनीधींना भेटून आपलं गाऱ्हाणं मांडत आहेत. त्यातच, जामोद येथे धक्कादायक घटना घडल्याचं समोर आलं आहे. अतिवृष्टीमुळे शेतीच झालेल्या नुकसानीचा मोबदला न मिळाल्याने शेतकऱ्याने आ.संजय कुटे (MLA) यांचं निवासस्थान पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याप्रकरणी, संबंधित शेतकऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Continues below advertisement


जळगावमधील भाजप नेते आणि आमदार संजय कुटे हे शुक्रवारी मध्यरात्री त्यांच्या जळगाव जामोद येथील निवासस्थानी हजर असताना संग्रामपूर तालुक्यातील बावनबीर येथील शेतकरी विशाल मुरुड याने संजय कुटे यांच्या निवासस्थानाच्या परिसरात प्रवेश मिळवला व हातात पेट्रोलचे कॅन घेऊन मला अतिवृषटीमुळे झालेल्या नुकसानीचा मोबदला अद्याप न मिळाल्याने मी आमदारांचा बंगला जाळून टाकतो, असं म्हणत पेट्रोलचे कॅन घेऊन बंगल्याच्या प्रवेश द्वारकडे मार्गक्रमण केले. 


शेतकरी विशाल मुरुड हे बंगल्याच्या प्रवेशद्वाराकडे जात असताना आमदार कुटे यांचे स्वीय सहायक यांनी त्यास पकडून पोलिसांच्या स्वाधीन केलं. याप्रकरणी पोलिसांनी शेतकरी विशाल मुरुड यांच्याविरुद्ध BNS  333, 351(2) नुसार गुन्हा दाखल केला आहे, पुढील चौकशी जळगाव जामोद पोलीस करत आहेत.



डॉ. संजय कुटे कोण?




डॉ. संजय कुटे भाजपचे नेते असून जळगाव-जामोद मतदारसंघातून ते गेल्या 20 वर्षांपासून आमदा आहेत. सन 2004 साली ते प्रथम आमदार बनून विधिमंडळात पोहोचले. विधिमंडळात देवेंद्र फडणवीसांच्या मागच्या बाकड्यावर बसून सत्तेत असताना विरोधकांना आणि विरोधात असताना सत्ताधाऱ्यांना आपल्या अभ्यासपूर्ण आक्रमक भाषणानं सळो की पळो करून सोडणारे नेते म्हणून डॉ. संजय कुटे यांची राजकीय वर्तुळात ओळख आहे.



हेही वाचा


पुण्यातील IT पार्क हिंजवडीची नवी ओळख का बनतेय 'वॉटर पार्क'? याला जबाबदार कोण?