National Executive Meeting: भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीच्या शेवटच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांचे कौतुक केले. त्यांनी द्रौपदी मुर्मू यांचे कौतुक करताना सांगितले की, ''द्रौपदी या राष्ट्रपती होणार्‍या पहिल्या आदिवासी महिला असतील. यासोबतच आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहाशी जोडण्यास मदत होईल.'' भाजप कार्यकारिणीच्या बैठकीच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात पंतप्रधान मोदींच्या भाषणाने झाली. कार्यकारी समितीच्या सदस्यांना संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम हे आतापर्यंतच्या सर्वोत्तम राष्ट्रपतींपैकी एक होते. परंतु भाजपने त्यांचे नाव पुढे केले तेव्हाच लोकांनी त्यांचे नाव स्वीकारले. 


पंतप्रधान मोदींनी राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांचे खूप कौतुक केले. आदिवासी समाजातून राष्ट्रपती होणार्‍या त्या पहिल्या महिला असतील, असे पंतप्रधान म्हणाले. सार्वजनिक जीवनातील त्यांच्या असाधारण आचरणाचे त्यांनी कौतुक केले. पंतप्रधानांनी मुर्मू यांच्याबद्दल सविस्तरपणे सांगितले की, त्यांनी त्यांचे जीवन अत्यंत साधेपणाने जगले आहे. जसे माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम होते. अब्दुल कलाम यांच्यासाठी जसा उत्साह आणि भावना होती, तीच आज द्रौपदी मुर्मू यांच्यासाठीही आहे.
 
दरम्यान, पाच वर्षांपूर्वी द्रौपदी मुर्मू यांच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा झाला होता. 2017 मध्ये माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचा कार्यकाळ संपणार होता. तेव्हाही भाजपने त्यांच्या नावाचा विचार केला होता, पण त्यावेळी बिहारचे राज्यपाल रामनाथ कोविंद (Ramnath Kovind) यांना राष्ट्रपतीपदाची उमेदवारी देण्यात आली. मात्र आता झारखंडच्या राज्यपाल म्हणून द्रौपदी मुर्मू यांची स्वच्छ प्रतिमा आणि निर्णय घेण्याची क्षमता पाहून एनडीएने त्यांना राष्ट्रपतीपदाची उमेदवार दिली असावी.


इतर महत्त्वाच्या बातम्या