Aditya Thackeray : शिवसेना (Shivsena) नेते आणि आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी विधानसभेमध्ये भाषणात भाजपवर चांगलाच घणाघात केला आहे. विधानसभा अध्यक्ष म्हणून राहुल नार्वेकर यांची निवड झाल्यानंतर त्यांचं अभिनंदन करताना आदित्य ठाकरे बोलत होते. राज्यात गेले काही दिवस सुरु असलेला सत्तासंघर्ष आणि त्यानंतरच सत्तांतर यामुळे महाराष्ट्रात रणकंदन सुरु आहे. यावरून आज विधानसभेत शिवसेना आणि भाजप आमनेसामने आले. यावेळी शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांनी मुनगंटीवार यांना प्रत्त्युत्तर देताना म्हटलं आहे की, 'जर भाजपनं अडीच वर्षांपूर्वी आमचं ऐकलं असतं तर आज ही वेळच आली नसती.'


शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी अॅड. राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल शुभेच्छा देत अभिनंदन केलं. तसेच आदित्य ठाकरे यांनी राहुल नार्वेकर यांच्यासोबतच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला आणि नार्वेकर यांनी भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.


आदित्य ठाकरे यांचं सुधीर मुनगंटीवार यांना प्रत्युत्तर


भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत भाषणावेळी नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिंदे गटाला म्हटलं की, 'माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तुमचं ऐकलं नाही, त्यामुळे तुम्ही हा मार्ग पत्करला. पण असं काही पाऊल उचलताना आमच्या कानात नक्की सांगा.' याला प्रत्युत्तर देताना आदित्य ठाकरे यांनी म्हटलं की, 'अडीच वर्षापूर्वी भाजपनं शिवसेनेनं सांगितलं असतं. तर आज ही वेळ आली नसती.'


अजित पवार यांची टोलेबाजी


नार्वेकरांचं अभिनंदन करताना माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टोलेबाजी केली. अजित पवार यांनी म्हटलं की, 'एकनाथ शिंदेंनी माझ्या कानात सांगितलं असतं की अडीच वर्ष झालीत, आता मला मुख्यमंत्री पदावर बसायचंय. तरी आम्ही तुम्हाला तिथं बसवलं असतं. काही प्रॉब्लेम झाला नसता. यावेळी त्यांनी आदित्य ठाकरे यांना कोट करत 'नसता आला ना प्रॉब्लेम' असं विचारलं. यावरही सभागृहात हशा पिकला.'


'आमच्या कानात नक्की सांगा'


यानंतर सुधीर मुनगंटीवार यांनी शिंदे गटाला म्हटलं की, 'उद्धव ठाकरे यांनी तुमचं ऐकलं नाही, त्यामुळे तुम्ही वेगळा मार्ग निवडला. पण असं काही पाऊल उचलताना आमच्या कानात नक्की सांगा, आम्ही ऐकू.' याला प्रत्युत्तर देताना आदित्य ठाकरे यांनी म्हटलं की, 'अडीच वर्षापूर्वी भाजपनं शिवसेनेनं सांगितलं असतं. तर आज ही वेळ आली नसती.'


महत्त्वाच्या इतर बातम्या