Rajnath Singh: भारत आता कमकुवत राहिलेला नसून तो जगातील एक शक्तिशाली देश बनला आहे. जो 2047 पर्यंत विश्वगुरू बनेल, असे केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Defence Minister Rajnath Singh) मंगळवारी म्हणाले आहेत. भारताने आजपर्यंत जगातील कोणत्याही देशावर कधीही हल्ला केलेला नाही, मात्र जर कोणी भारताकडे वाईट नजरेने पाहण्याचा प्रयत्न केला तर भारताने त्याला चोख प्रत्युत्तर दिले आहे, असेही संरक्षण मंत्री म्हणाले.
केंद्रातील विद्यमान सरकार भारताचा सन्मान आणि स्वाभिमान कोणत्याही किंमतीवर कमी होऊ देणार नाही, असे राजनाथ सिंह म्हणाले. आज केंद्रीय संरक्षण मंत्री राजस्थानच्या उदयपूर शहरात पन्नाधय यांच्या पुतळ्याच्या उद्घाटन समारंभाला संबोधित करत होते. यावेळी राजनाथ सिंह म्हणाले, 'आम्हालाही संकल्प घ्यायचं असून भारताला एक मजबूत आणि शक्तिशाली देश बनवायचा आहे. भारताचे संरक्षण मंत्री या नात्याने मला असे म्हणायचे आहे की, भारत आता कमकुवत भारत राहिलेला नाही, भारत आता जगातील एक शक्तिशाली देश बनला आहे.
जम्मू-काश्मीरमधील उरी आणि पुलवामा (Uri And Pulwama Attack) येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यांचा संदर्भ देत राजनाथ सिंह म्हणाले, 'मी तुम्हाला सांगू इच्छितो की मला भारताच्या सामर्थ्यावर विश्वास आहे. पाकिस्तानचे दोन दहशतवादी आले आणि त्यांनी आमच्या पॅरा मिलिटरी फोर्सेसच्या जवानांवर हल्ला केल्याचे तुम्ही पाहिले. उरी आणि पुलवामाच्या घटनांशी आपण सर्व परिचित आहात. जेव्हा मी त्या घटनेबद्दल चर्चा करतो तेव्हा मला आठवते की त्या दिवशी माझ्या पॅरा मिलिटरी फोर्सेसच्या शहीद जवानांचे मृतदेह खांद्यावर घेतल्यावर मला कसे वाटत होते.' ते म्हणाले, 'त्यानंतर तुम्ही पाहिले की आपल्या पंतप्रधानांनी आपल्या तीन मंत्र्यांपैकी दोघांना बोलावून पाच मिनिटांत निर्णय घेतला आणि आपले लष्कराचे जवान भारताच्या नव्हे तर पाकिस्तानच्या भूमीत जाऊन दहशतवाद्यांचा संपूर्ण खात्मा करण्यात यशस्वी झाले.
'भारत 2047 पर्यंत विश्वगुरू बनेल'
ते म्हणाले, 'भारत केवळ पंतप्रधानांमुळेच जागतिक नेता म्हणून उदयास आला आहे. आपल्या पंतप्रधानांची प्रतिमाही जागतिक नेत्याची झाली आहे. हे सत्यही आपण स्वीकारले पाहिजे. मला असे म्हणायचे आहे की भारताला विश्वगुरू होण्यासाठी फक्त 25 वर्षे लागतील. 2047 पर्यंत भारत विश्वगुरू बनलेला असेल.