Arvind Kejriwal On BJP: दिल्लीत सुरू असलेल्या राजकीय आरोप-प्रत्यारोपाच्या फेरीत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधला आहे. केजरीवाल म्हणाले की, ते (BJP) लिकर धोरणात घोटाळा झाल्याचे सांगत होते, मात्र सीबीआयने घोटाळा झाला नसल्याचे सांगितले. लोक त्याचे ऐकत नाहीत. आता ते अण्णा हजारे (Anna Hazare) यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून चालवत आहेत. राजकारणात हे सामान्य आहे.
केजरीवाल म्हणाले, "आम्ही कोणत्याही तपासासाठी सदैव तयार आहोत. सीबीआयने सर्व तपास पूर्ण केला आहे. मनीष सिसोदिया यांना 14 तास चौकशी केली. त्यांनी त्यांच्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे दिली. त्यांच्या लॉकरमध्ये काहीही सापडले नाही. त्यांना अनधिकृत क्लीन चिट देण्यात आली आहे."
केजरीवाल म्हणाले की, "आता सीबीआयच्या तपासातून काहीही निष्पन्न झाले नाही, त्यात कोणतेही राजकारण नसावे. आता त्यांना प्रत्येकी 20 कोटी रुपयांना दिल्लीतील आमदार कसे विकत घ्यायचे होते. याचा तपास व्हायला हवा. जर आम्ही यापासून पळ नाही काढत आहे, तर ते का काढत आहेत?"
दरम्यान, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी दिल्लीच्या लिकर धोरणावर मुख्यमंत्री केजरीवाल यांना पत्र लिहिले होते. या पत्राबाबत अण्णा हजारे म्हणाले की, "त्यांनी (मुख्यमंत्री केजरीवाल) प्रत्येक वॉर्डात दारूची दुकाने उघडली आणि वयोमर्यादा 25 वर्षांवरून 21 वर्षे केली. ते दारूला प्रोत्साहन देत आहेत. मी त्यांना पहिल्यांदाच त्याविरोधात पत्र लिहिले. जेव्हा मी विरोध करत होतो तेव्हा ते मला त्यांचे गुरू म्हणायचे, आता त्या भावना कुठे गेल्यात?
इतर महत्वाच्या बातम्या:
Congress President Election: शशी थरूर काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवणार का? याबाबत काय म्हणाले ते जाणून घ्या
देशात दर तासाला 5 जणांच्या आत्महत्या, तर पंतप्रधानांच्या मित्राच्या संपत्तीत तासाला 85 कोटींची भर; राहुल गांधींचा मोदींवर निशाणा