Income Tax Raids on Sanjeevraje Nimbalkar, Satara : शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या घरावर सुरू असलेली आयकर विभागाची कारवाई पाचव्या दिवशी संपली. आयकर विभागाने निंबाळकरांच्या घरावर बुधवारपासून छापेमारी सुरु केली होती, ती संपली आहे. दरम्यान, आयकर विभागाची कारवाई संपल्यानंतर कार्यकर्त्याचा एकच जल्लोष केलेला पाहायला मिळालाय. यावेळी कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जल्लोष केलाय. संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या समर्थनार्थ कार्यकर्त्यांची घोषणाबाजी केली. मात्र, छापेमारीत आयकर विभागाच्या हाती काय काय लागलं? संजीवराजे निंबाळकर आणि त्यांचे विरोधक माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर काय काय म्हणाले? जाणून घेऊयात..
फलटणमध्ये संजीवराजे नाईक निंबाळकर आणि रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या घरावर आयकर विभागाने छापा टाकला. आजचा कारवाईच्या पाचव्या दिवशी कारवाई संपली आहे.. यावरती संजीवराजे नाईक निंबाळकर यांचे राजकीय विरोधक रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
रणजितसिंह निंबाळकर म्हणाले, संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या घरावर छापा पडला पण रघुनाथराजे यांच्या घरावर छापा पडला ही अफवा आहे.
ज्या दिवशी फलटणमध्ये छापा पडला, त्यावेळी अनेक ठिकाणी छापा पडला. यापूर्वी माझेही सर्च अनेकवेळा झाले आहेत. ज्यावेळी मी लोकसभेचा फॉर्म भरला त्यावेळी 60 लाख रुपये दंड पडला होता.मग त्याला राजकारण समजावं का? असा सवालही रणजितसिंहांनी केला.
पुढे बोलताना रणजितसिंह म्हणाले, संजीवराजे यांची मुलाखत तुम्ही घ्या ते तुम्हाला राजकारण सांगतील. मला वाटत नाही त्या खालच्या पद्धती ला जाऊन कोणी राजकारण करेल फलटणला एक राजकीय संस्कृती आहे. आमदार साहेब यांच्या भावाच्या कुटुंबीयांवरती कारवाई झाली चार कोटी दंड केला. हा रुटीन कारवाईचा भाग आहे असे मला वाटते. इन्कम टॅक्स कुणाच्या सांगण्यावरून कारवाई करत नाही. ज्यावेळी कारवाई होते त्यावेळेस त्रास होतो याची मला कल्पना आहे. याच कारवाई मागे आम्ही, आमचा पक्ष किंवा अजितदादांचा पक्ष आहे असं अजिबात नाही. संजीवराजे नाईक निंबाळकर हे पूर्वीपासूनच राष्ट्रवादीमध्ये आहेत. ज्यावेळेस अजितदादांचा पक्ष कमजोर झाला असं वाटलं त्यावेळेस ते महाविकास आघाडीत गेले. आमची सत्ता निर्णय आली. सत्ता आल्यानंतर लोकांना वाटतं आपण सत्तेत राहावं. त्या दृष्टीने ते प्रयत्न करत असतील हा राजकारणाचा भाग आहे. रामराजे, संजीराजे किंवा रघुनाथराजे यांच्या विरोधात लोकांनी माझ्याकडे बघून कौल दिला. अजितदादांच्या शब्दावर आम्ही राष्ट्रवादीच्या चिन्हावर ते आम्ही उमेदवार दिला ते निवडून आले. फलटणचं भलं जर अर्थमंत्री यांच्याकडून होत असेल तर मला त्याचा आनंद आहे. फलटणचा लोकांना मी सांगितला आहे शब्द दिला आहे. मला बदला घ्यायचा नाही मला बदलाव करायचा आहे. मला एकदा शब्द दिला की मला त्याच्यामध्ये कारवाई करण्यामध्ये मला काही रस नाही. परंतु जर त्यांना जर तसा आरोप करायचा असेल तर तो त्यांच्या राजकारणाचा भाग आहे. फलटणमध्ये मला विकास करायचा आहे त्या दृष्टीने मी प्रयत्न करतोय.
चौकशीत काय काय झालं ? संजीवराजे निंबाळकर काय म्हणाले?
ही चौकशी गोविंद संदर्भात होती. त्यांना जी चौकशी करायची होती ती त्यांनी केली. आयकर विभागाने काही डेटा नेला आहे. पण जशी इतर ठिकाणी चौकशीत जे सापडते ते सापडलं नाही. जे त्यांनी घेतलं होतं ते परत दिले आहे. गोविंदच्या संचालकांची चौकशी झाली आहे. त्यामध्ये त्यांना काहीही आढळले नाही. पहिल्या दोन दिवसात चौकशी संपली होती. ही राजकीय होती का असे विचारले असता सांगता येत नाही. आताच्या काळात काहीही होऊ शकतं. राष्ट्रवादी पक्ष प्रवेशावर चर्चा सुरू आहे, अजून निश्चित नाही. काही डाटा घेऊन गेले आहेत जेव्हा ते विचारातील तेव्हा आम्ही उत्तर देऊ..
इतर महत्त्वाच्या बातम्या
आयकर विभागाची कारवाई संपली, अधिकाऱ्यांना नेमकं काय मिळालं? संजीवराजेंनी सगळचं सांगितलं