Rahul Solapurkar Apologies : गेल्या अनेक दिवसांपासून छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्यांची मालिका सुरु ठेवणाऱ्या अभिनेता राहुल सोलापूरकरने दुसऱ्यांदा माफी (Rahul Solapurkar Apologies) मागितली आहे. राहुल सोलापूरकर पॉडकास्टमधून शिवाजी महाराज यांच्या आग्रातील सुटकेबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यानंतर त्याला माफी मागावी लागली होती, आता डॉ.बाबासाहेब आंबेडकरांबाबतच्या वक्तव्याबाबत देखील त्याने माफी मागितली आहे. गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील आंबेडकरी चळवळीतील आंदोलकांनी राहुल सोलापूरकरला ((Rahul Solapurkar) इशारा दिला होता. त्यानंतर त्याने व्हिडीओ शेअर करत स्पष्टीकरण दिलंय.
राहुल सोलापूरकर काय काय म्हणाला?
शिवाजी महाराज यांच्या बद्दल एक चुकीचा शब्द गेला आणि शिवभक्तांची मी जाहीर माफी मागितली. लाच शब्द बोललो मी अनेकांच्या भावना दुखावल्या त्याबद्दल माफी मागितली. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल मी बोललेला असा एक व्हिडिओ समोर आला. बाबासाहेब आंबेडकर, शिवाजी महाराज यांच्याबद्दल मी अनेक व्याख्याने देत असतो. तरी हे का केलं जात आहे, याबद्दल मी अनभिज्ञ आहे. मी पुन्हा एकदा जाहीर माफी मागतो. महान व्यक्तीला कलाशीत करण्याचा प्रयत्न माझ्याकडून होणार नाही, असंही सोलापूरकर म्हणाला.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सचिन खरात गट पक्षातर्फे आज पुणे शहरामध्ये राहुल सोलापूरकर यांचा फोटो जाळून निषेध करण्यात आला. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल राहुल सोलापूरकर यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं असल्याचं एक ट्विट जितेंद्र आव्हाड यांनी केलं होतं. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सचिन खरात गट पक्षातर्फे सोलापूरकर यांचे फोटो जाळण्यात आले. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरात गट पक्षातर्फे कार्यकर्त्यांनी सोलापूरकर यांचे फोटो जाळत त्यांनी केलेल्या विधानाचा निषेध करण्यात आला. पुण्यातील कात्रज परिसरात कार्यकर्त्यांनी सोलापूरकर यांच्या विरोधात घोषणाबाजी करत त्यांचे पोस्टर जाळले.
दोन दिवसात राहुल सोलापूरवर गुन्हा दाखल करून अटक केली नाही तर यांच्या घरातून बाहेर काढून भर रस्त्यात चोप देणार, असा इशारा भीम आर्मीने दिली होता. मराठी अभिनेता राहुल सोलापूर यांनी परत एकदा राष्ट्रनिर्माते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषय वादग्रस्त शब्द वापरले आहेत. महाराष्ट्र सरकारने लवकरात लवकर गुन्हा नोंद करून याला अटक करावी अन्यथा राहुल सोलापूर याला घरातून बाहेर काढून चोप देऊ, असं भीम आर्मीने म्हटलं होतं.
इतर महत्त्वाच्या बातम्या