Ahilyanagar News अहिल्यानगर : राज्यात सर्वत्र निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय घडामोडींना वेग आला आहे. दरम्यान,  अहिल्यानगर (Ahilyanagar) जिल्ह्यातील मुळा सहकारी साखर कारखान्याबाबत (Mula Sahakari Sugar Factory) एक मोठी बातमी समोर आली आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शंकरराव गडाखांच्या  (Shankarrao Gadakh) साखर कारखान्याला आयकर खात्याने नोटीस बजावली आहे. या नोटीसमध्ये कारखान्याला 137 कोटी रुपये भरण्याचे आदेश देण्यात आले आहे. मात्र ऐन विधानसभा निवडणुकांच्या (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) तोंडावर ही नोटीस आल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.

  


निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दबाव टाकण्याचा प्रयत्न- शंकरराव गडाख


अहिल्यानगरच्या सोनई येथील मुळा सहकारी साखर कारखाना हा माजी जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या अधिपत्याखाली येतो. शंकरराव गडाख यांनी नुकताच शिवसेना उध्दव ठाकरे गटात प्रवेश केला होता. त्यामुळे निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गडाख यांच्यावर दबाव टाकण्याचा या प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, केवळ एकाच कारखान्याला नोटीस देण्यात आल्याने अनेक चर्चा सध्या परिसरात रंगू लागल्या आहेत. तर यामागे राजकरण असल्याचा गडाख यांनी आरोप केला आहे. परिणामी, याविरोधात उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचेही शंकरराव गडाख म्हणाले आहे. या कारवाई विरोधात उद्या शंकरराव गडाख कार्यकर्ता मेळावा घेणार असल्याचीही माहिती पुढे आली आहे. तर यापूर्वी सुद्धा संस्था अडचणीत आणण्याचा प्रयत्न झाला असल्याचेही ते म्हणालेय. मात्र विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शंकरराव गडाखांच्या साखर कारखान्याला आयकर खात्याची नोटीस आल्याने जिल्ह्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. 


निवडणुकीच्या तोंडावर आयकर खात्याची कारवाई सत्र


पुण्यातील खेड शिवापुर टोल नाक्यावर सोमवारी पुणे ग्रामीण पोलिसांनी 5 कोटी रूपये पकडले. तर त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी (मंगळवारी)  निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असलेल्या इच्छुक उमेदवारांच्या सासरी आयकर विभागाचे (Income Tax) छापा टाकला. यात पुण्यातील कोथरूड विधानसभा मतदारसंघात भाजपकडून बंडखोरी करणार असल्याची चर्चा असलेले भाजपचे नेते अमोल बालवडकर यांच्या सासरी म्हणजेच चंद्रकांत कटके यांच्या घरी आयकर विभागाचे (Income Tax) छापे टाकला.  सोबतच बालवडकर यांचे मेहुणे आणि डबल महाराष्ट्र केसरी पैलवान अभिजीत कटकेच्या (Abhijeet Katke) घरी ईडीची धाड टाकली आहे. एवढच नाही तर अभिजीत कटेकवर ज्या तालमीत सराव करतात तिथे देखील आयकर अधिकारी पोहचले. दरम्यान, भाजपचे  प्रदेशाध्यक्ष  चंद्रशेखर बावनकुळे यांनी अमोल बालवडकर यांची नाराजी दूर करण्यासाठी त्यांच्या घरी भेट दिली होती . मात्र ते ऐकत नसल्याने ही इन्कम टॅक्सची रेड चर्चा रंगल्या आहे. अशातच आता शंकरराव गडाखांच्या साखर कारखान्याला आयकर खात्याची नोटीस आल्याने जिल्ह्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.


 


हे ही वाचा :


मोठी बातमी : डबल महाराष्ट्र केसरी अभिजीत कटकेच्या घरी आयकर छापा, विधानसभेच्या रणधुमाळीत छापेमारी