गुवाहाटीला गेलेल्या सगळ्या सहकाऱ्यांना तिकीट, एकनाथ शिंदेंच्या पहिल्या यादीत कोण कोण?
मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाने विधानसभा निवडणुकीसाठी 22 ऑक्टोबर रोजी आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. या यादीत एकूण 45 उमेदवारांची नावे आहेत. तुलनेने सुरक्षित आणि जागावाटपात कोणताही वाद नसलेल्या मतदासंघांचा या यादीत समावेश करण्यात आला आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या बंडामध्ये ज्या आमदारांनी साथ दिली होती, त्या आमदारांना शिंदे यांनी पुन्हा एकदा तिकीट दिलं आहे. 
एकनाथ शिंदे यांनी 2022 साली बंड केलं होतं. बंड करून ते शिवसेनेच्या अनेक आमदारांना घेऊन थेट गुवाहाटीला गेले होते. गुवाहाटीमध्ये मुक्काम ठोकल्यानंतर इतरही अनेक आमदारांनी गुवाहाटी गाठलं होतं. या बंडानंतर एकनाथ शिंदे आणि भाजपा यांच्यात सत्तास्थापनेसाठी चर्चा चालू होती. ही चर्चा पूर्ण होईपर्यंत शिवसेनेचे हे सर्व आमदार गुवाहाटीमध्येच मुक्कामी होते. याच सर्व आमदारांचा आता शिंदे यांनी उमेदवारांच्या पहिल्याच यादीत समावेश केला आहे. बंडात सहभागी असलेल्या सर्व आमदारांना शिंदे यांनी पुन्हा तिकीट दिलं आहे. 


पहिल्या यादीत कोणकोणत्या नेत्यांना तिकीट? मतदारसंघ कोणता? 


1) एकनाथ शिंदे- कोपरी पाचपाखाडी


2) मंजुळाताी गावित- साक्री (अनुसूचित जाती)


3) चंद्रकांत सोनावणे - चोपडा (अनुसूचित जाती)


4) जळगाव ग्रामीण- गुलाबराव पाटील


5) किशोर पाटील- पाचोा


6) चंद्रकांत पाटील- मुक्ताईनगर


7) संजय गायकडवाड- बुलढाणा


8) संजय रायमुलकर- मेहकर (अनुसूचित जाती)


9) अभिजित अडसूळ- दर्यापूर (अनुसूचित जाती)


10) आशिष जैस्वाल- रामटेक


11) नरेंद्र भोंडेकर- भंडारा (अनुसूचित जाती)


12) संजय राठोड- दिग्रस


13) बालबाजी कल्याणकर- नांदेड उत्तर


14) संतोष बांगर- कळमनुरी


15) अर्जुन खोतकर- जालना


17) अब्दुल सत्तार- सिल्लोड


18) प्रदीप जैस्वाल- छत्रपती संभाजीनगर मध्य


19) संजय शिरसाट- छत्रपती संभाजीनगर पश्चिम (अनुसूचित जाती)


20) विलास भुमरे -पैठण


 21) रमेश बोरनारे- वैजापूर


 22) सुहास कांदे- नांदगाव


 23) दादाजी भुसे- मालेगाव बाह्य


24) प्रताप सरनाईक ओवळा माजीवडा


25) प्रकाश सुर्वे- मागाठाणे


26) मनिषा वायकर- जोगेश्वरी (पूर्व)


27) दिलीप लांडे- चांदिवली


28) मंगेश कुडाळकर- कुर्ला (अनुसूचित जाती)


29) सदा सरवणकर- माहीम


30) यामिनी जाधव - भायखळा


31) महेंद्र थोरवे- कर्जत 


31) महेंद्र दळवी- अलिबाग


33) भरतशेठ गोगावले- महाड


34) ज्ञानराज चौगुले- उमरगा (अनुसूचित जाती)


35) तानाजी सांवंत- परंडा


36) शहाजीबापू पाटील- सांगोला


 37) महेश शिंदे- कोरेगाव


 38) शंभूराज देसाई-पाटण


 39) योगेश कदम- दापोली


40) उदय सामंत- रत्नागिरी


41) किराण सामंत- राजापूर


42) दीपक केसरकर- सावंतवाडी


43) प्रकाश आबिटकर- राधआनगरी 


44) चंद्रदीप नरके- करवीर


45) सुहास बाबर- खानापूर 


हेही वाचा :


उद्धव ठाकरेंचं सर्वात मोठं चक्रव्यूह! एकनाथ शिंदेंना हरवण्यासाठी आनंद दिघेंच्या पुतण्याला तिकीट? कोपरी पाचपाखडीसाठी खास रणनीती


दापोली ते पैठण! कुठे मुलगा तर कुठे भाऊ, शिंदेंच्या शिवसेनेत अनेक जागांवर प्रस्थापितांच्या पुढच्या पिढीला तिकीट!


Shiv sena Shinde camp candidate list: शिंदे गटाची 45 उमेदवारांची यादी जाहीर होताच पहिली बंडखोरी, प्रेमलता सोनावणे शिवसेनेच्या संजय गायकवाडांविरोधात अपक्ष लढणार