Imtiyaz Jaleel on Vishalgad Issue : "सर्व हिंदुत्वादी संघटनांना मी तिकडे नको आहे. कोल्हापूर तुमच्या बापाची जहागीर नाही. मी कोल्हापूरला जाण्याबाबत 100 टक्के निर्णय घेणार आहे. खुले आम मशिदीची तोडफोड केली जातेय, याचा अतिक्रमणाची सबंध नाही. पोलिसांनी जबाबदारी पार पाडली असती, तर असं झालचं नसतं", असे छत्रपती संभाजीनगरचे माजी खासदार आणि एमआयएमचे नेते इम्तियाज जलील (Imtiyaz Jaleel) म्हणाले. ते छत्रपती संभाजीनगरमध्ये (Jalna) बोलत होते. 


आज एक मशीद पाडली, उद्या दुसरी पाडतील


इम्तियाज जलील म्हणाले, आज एक मशीद पाडली, उद्या दुसरी पाडतील. राज्यात काँग्रेस असो राष्ट्रवादी आणि सेक्युलर पक्षाचे कोणते नॉन मुस्लिम लोक याबाबत निवेदन देत आहेत. माझ्या घरावर हल्ला सहन करेल, पण मशिदी वर नाही. कोणी कोणी तोडफोड केली यावर कारवाई करावी. संभाजी महाराजांनी या आंदोलनाचे नेतृत्व करत होते, शाहू महाराजांचे वंशज माणणारे स्वतःच्या नावापुढे छत्रपती लावणारे अशा हिंसक आंदोलन करणार का? असा सवालही इम्तियाज जलील यांनी केला. 


तुम्हाला एकदा शाहू महाराजांचे पुस्तक पाठवतो ते वाचा


पुढे बोलताना इम्तियाज जलील म्हणाले, तुम्हाला एकदा शाहू महाराजांचे पुस्तक पाठवतो ते वाचा. त्यांचा मुलगा तोडफोड करतो आणि वडील म्हणतात शांतता राखा. संभाजीनगरमधील किराडपुऱ्यात राम मंदिरावर हल्ला होत होता. तेव्हा त्या ठिकाणी कोणता मर्द आला नव्हता , त्या ठिकाणी एकटा इम्तियाज जलील आला होता. विधानसभेची निवडणूक आली म्हणून तुम्हाला दर्गा आठवते. सर्व हिंदुत्वादी संघटनाना मी तिकडे नको आहे, कोल्हापूर तुमच्या बापाची जहागीर नाही, मी 100 टक्के कोल्हापूर जाण्याबाबत निर्णय घेणार, असंही इम्तियाज जलील यांनी सांगितले. 


जे स्वत:ला शाहू महाराजांचे वंशज म्हणवतात. मी संभाजी महाराजांना मी एक प्रश्न विचारतो की, तुम्ही मला शाहू महाराजांचे पुस्तकं दिले होते. मी आपल्याला होत जोडून विनंती करतो संभाजी महाराज, ते पुस्तक एकदा वाचा. संभाजी महाराज (Sambhaji Maharaj) कोण होते? शाहू महाराज कोण होते? त्या शाहू महाराजांचे (Shahu Maharaj) आपण वंशज असाल तर कुठे छ. शाहू महाराज (Shahu Maharaj) आणि कुठे जाळपोळीचं नेतृत्व करणारे तुम्ही?", असा सवाल छत्रपती संभाजीनगरचे माजी खासदार इम्तियाज जलील (Imtiyaz Jaleel ) यांनी केला आहे.


इतर महत्वाच्या बातम्या 


Imtiyaz Jaleel on Vishalgad Issue : कुठे छ. शाहू महाराज आणि कुठे जाळपोळीचं नेतृत्व करणारे तुम्ही, इम्तियाज जलील यांचे संभाजीराजेंना खडे सवाल!