छत्रपती संभाजीनगर: राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Vidhan Sabha Election)  पार्श्वभूमीवर एमआयएम पक्षाचे माजी खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jalil)  यांनी एक महत्त्वपूर्ण वक्तव्य केले आहे. इम्तियाज जलील यांनी बीडमधून विधानसभा निवडणूक लढण्याचे संकेत दिले आहेत. यावेळी त्यांनी अनेक राजकीय मुद्द्यांवर भाष्य केले. 


मी एमआयएम पक्ष 200 टक्के सोडणार नाही. असदुद्दीन ओवैसी यांनी मला संधी दिली. मला त्यांच्याकडून प्रेरणा मिळाली. मी एमआयएम सोडून जाण्याची चर्चा होते. पण मी कुठेही जाणार नाही, असे जलील यांनी स्पष्ट केले. मी लोकसभा निवडणुकीत पराभूत झाल्यावर ओवैसी यांना म्हटले की, आम्ही दोन उमेदवार शहरात नाही. पण त्यांचा वेगळा विचार आहे. ते म्हणतील तसे आम्ही करु. आम्ही एक सर्वेक्षण करत आहोत. त्यामध्ये इच्छुकांची नावे आहेत, त्यामध्ये माझे नावही आहे, असे जलील यांनी म्हटले.


इम्तियाज जलील यांची इंडिया आघाडीला ऑफर


राज्यात तिसरी आघाडी व्हावी, अशी इच्छा आहे. मी शरद पवारांना भेटल्याच्या बातमीत तथ्य नाही. लोकसभा निवडणुकीतत जे मुस्लिम समाजाचे मतदान उद्धव यांना मिळाले ते विधानसभेला परत मिळेल, असे त्यांनी समजू नये . लोकसभेत वक्फ बोर्डाचा प्रस्ताव आल्यावर ठाकरे गटाचे खासदार निघून गेले.  बीडच्या लोकांची इच्छा आहे की, मी बीडमधून निवडणूक लढवावी. मला संधी मिळाली तर मी बाहेरून लढेन, असे जलील यांनी सांगितले.


शरद पवार, काँग्रेस आणि नव्याने सेक्युलर झालेली शिवसेना यांनी एमआयएमला सोबत घ्यावे. आज मी जाहीरपणे इंडिया आघाडीला ऑफर देतो, तुम्ही ठरवाल त्या सीट लढवू. याचा फायदा आम्हाला जसा होईल तसा तुम्हाला होईल . आमची इंडिया आघाडी सोबत येण्याची इच्छा आहे , असे इम्तियाज जलील यांनी म्हटले.


महाराष्ट्रातील अनेक मुलींची परराज्यात विक्रीः इम्तियाज जलील


राज्यात मुली बेपत्ता होत आहेत. 2023 मध्ये 188 मुली घरून गायब होत्या, तर 2024 मध्ये शहरातून 106 तर जिल्ह्यातून 105 मुली गायब झाल्या आहेत. म्हणजे या 8 महिन्यात 211 महिला गायब झाल्या आहेत. यापैकी काही मुलींची इंदौर, उज्जैन परिसरात दीड लाखांना विक्री झाली आहे. त्याठिकाणी महाराष्ट्रातील अनेक मुली आहेत. या मुलींना परत आणण्यासाठी चळवळ सुरु करायला हवी. या सगळ्या रेड लाईट एरियात शोधमोहीम राबवली तर मोठं रॅकेट समोर येईल. मंत्री साहेब आम्हाला 1500 फुकट नको, न्याय द्या. भरकटलेल्या मुलींना परत आणा, असे इम्तियाज जलील यांनी म्हटले.


हे ही  वाचा :


नवनीत राणा चिप मेंटॅलिटीची बाई, भाजपने भुंकण्यासाठी सोडलंय; इम्तियाज जलिल यांचा जबरा पलटवार