Presidential Election 2022: पश्चिम बंगालमधील भाजप खासदार दिलीप घोष यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. घोष यांनी शरद पवार यांचे दहशतवाद्यांशी संबंध होते, असा आरोप केला आहे. ते म्हणाले आहेत की, आपल्या देशात असे राष्ट्रपती असतील तर दहशतवाद वाढेल. ममता बॅनर्जींवर निशाणा साधत ते म्हणाले, 'दीदींना वाटतं की, सगळ्यांनी त्यांच्याशी एकदा बोललं तर ते ऐकतील. मात्र त्यांचं नाव कोणीच घेत नाही.' पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले की, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी स्वत:ला राष्ट्रीय नेत्या म्हणून प्रस्थापित करण्याचे स्वप्न पाहत आहेत, त्यामुळे त्या अशा चर्चा आणि बैठका करत राहतात.
तत्पूर्वी, 18 जुलै रोजी होणाऱ्या आगामी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या शर्यतीपासून काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी स्वतःला दूर केले होते. याचदरम्यान पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शरद पवार यांची त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांनी राष्ट्रपती निवडणुकीबाबत चर्चा केल्याचे सूत्रांकडून समजते. ही बैठक सुमारे 20 मिनिटे चालली. या भेटीबाबत शरद पवार यांनी ट्वीट करून लिहिले आहे की, ममता बॅनर्जी आज माझ्या दिल्लीतील निवासस्थानी भेटल्या. आपल्या देशाशी संबंधित विविध विषयांवर सविस्तर चर्चा झाली.
शरद पवार यांच्यावर निशाणा साधत दिलीप घोष म्हणाले की, लोकांचा सीबीआयवरील विश्वास उडत चालला आहे. मात्र, त्यांचा सीबीआयच्या तपासावर विश्वास आहे. दरम्यान, विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ 24 जुलै रोजी संपत आहे. त्यामुळे आता राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक होणार आहे. निवडणूक आयोगाने राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची अधिसूचना जाहीर केली आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी 18 जुलै रोजी मतदान होणार असून 21 तारखेला मतमोजणी होणार आहे. एकापेक्षा जास्त उमेदवार असतील तेव्हा राष्ट्रपतीपदासाठी मतदान होईल. 18 जुलै रोजी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मतदान करायचे असल्यास लोकसभा, राज्यसभा आणि विधानसभेचे सदस्य त्यात सहभागी होतील आणि 21 जुलै रोजी मतमोजणी होईल. त्यानंतर देशाच्या नवीन राष्ट्रपतींच्या नावाची घोषणा होईल.
इतर महत्वाच्या बातम्या:
Presidential Election 2022 : शरद पवारांनीच राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवावी, ममतांच्या बैठकीत शिवसेनेचा आग्रह
शरद पवारांच्या नकारानंतर राष्ट्रपती निवडणुकीसाठी बैठक, ममतांच्या हाकेला विरोधकांची साद, कोण कोण उपस्थित?