Student Admission Issues: बुधवारपासून राज्यातील जवळपास सर्वच शाळा सुरु झाल्या आहेत. त्यामुळे पाल्यांचे प्रवेश करण्यासाठी पालकांची धरपड सुरु आहे. मात्र औरंगाबादच्या लिटिल फ्लॉवर शाळेत मागील फीस बाकी असल्याने मुलांना प्रवेश दिले जात नसल्याचा आरोप पालकांनी केला आहे. त्यामुळे आज सकाळी एमआयएम आणि पालकांनी या शाळेसमोर आंदोलन केले. यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त पाहायला मिळाला. 


शहरातील छावणी भागातील लिटिल फ्लॉवर शाळेच्या गेटवर एमआयएम आणि पालकांनी आंदोलन केले. यावेळी बोलताना पालक म्हणाले की, आमचे मुलं याचे शाळेचे विध्यार्थी आहेत. आता आम्ही पुढील प्रवेश घेण्यासाठी आलो असता, मागील फीस भरल्याशिवाय प्रवेश मिळणार नसल्याचे शाळेकडून सांगितले जात आहे. कोरोना परिस्थिती पाहता मागील फीस भरण्यासाठी आम्हाला काही  सूट द्यावी आणि आत्ताचे प्रवेश करावे अशी मागणी पालकांनी यावेळी केली. मात्र शाळा प्रशासनाला हे मान्य नसून, मागील फीस पूर्ण भरल्याशिवाय पुढील प्रवेश देणार नसल्याची भूमिका त्यांनी घेतली असल्याचा आरोप पालकांनी केला आहे. त्यामुळे 100 पेक्षा अधिक मुलांना याचा फटका बसणार असल्याचा दावा एमआयएमचे नेते कुणाल खरात यांनी केला आहे.


शाळेची भूमिका... 


तर यावर प्रतिक्रिया देताना शाळा प्रशासन म्हणाले की, अनेक मुलांची दोन-तीन वर्षांची फीस बाकी आहे. आता त्यांना ती फीस भरायचीच नाही. अनेकांची सहावीपासून फीस बाकी आहे. आम्ही त्यांना सहकार्य करण्याचा प्रयत्न करतोय. शासनाच्या जीआरनुसार सवलत देण्याचाही प्रयत्न करत असल्याची बाजू शाळा प्रशासनाने मांडली आहे.


रोज आंदोलन करणार...


मागील फीस न भरल्याने मुलांना प्रवेश दिला जात नसल्याने एमआयएमने सुद्धा यावेळी लिटिल फ्लॉवर शाळेच्या गेटवर पालकांसोबत आंदोलनात सहभाग नोंदवला. तसेच शाळेच्या आडमुठेपणाच्या भुमिकेमुळे उद्याच्या भविष्य असणाऱ्या मुलांचे मोठ नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे 70 ते 100 मुलांचा नुकसान होणार आहे. म्हणून जोपर्यंत या मुलांचे प्रवेश प्रकिया पूर्ण होणार नाही,तोपर्यंत शाळेसमोर आम्ही रोज आंदोलन करणार असल्याचा इशारा कुणाल खरात यांनी दिला. 


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI