Hingoli News: राज्यात नुकत्याच झालेल्या विधानपरिषदेच्या निवडणूकीत (Vidhan Parishad election) आमदार प्रज्ञाताई सातव (Pradnyatai Satav) यांच्या विजयानं हिंगोली जिल्ह्यात काँग्रेसचं पारडं जड झालं आहे.  विधनसभेच्या आमदारांमधून विधानपरिषदेवर प्रतिनिधित्व करणाऱ्या प्रज्ञाताई काँग्रेसच्या एकमेव आमदार ठरल्या असून काँग्रेसचे जिल्ह्यातील बळकटी वाढणार आहे.


प्रज्ञाताईंची विधनपरिषदेतील दुसरी इनिंग


आमदार प्रज्ञाताई सातव यांची विधान परिषदेतील ही दुसरी इनिंग राहणार असून २०२१ मध्ये देखील काँग्रेसने प्रज्ञाताई सातव यांना विधान परिषदेची उमेदवारी दिली होती. या निवडणुकीत त्या बिनविरोध निवडून आल्या होत्या. दरम्यान, काम करण्यासाठी साधारणतः दोन ते अडीच वर्षांचाच कार्यकाळ त्यांना मिळाल्याने काँग्रेसने यावेळेस पुन्हा एकदा आमदार प्रज्ञाताई सातव यांना उमेदवारी दिली होती.


हिंगोलीत काँग्रेसला बळकटी


हिंगोलीत  शिवसेना शिंदे गट, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट पक्षांचे आमदार जिल्ह्यात आहेत. त्यामुळे आता प्रज्ञाताईसातव यांच्या विजयाने काँग्रेसला जिल्ह्यात प्रतिनिधित्व मिळाले असून हिंगोली जिल्ह्यात काँग्रेसला बळकटी मिळेल असा विश्वास काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये आहे.


लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने मिळवलेल्या यशानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांचा उत्साह वाढता आहे. त्यातच हिंगोलीत काँग्रेसला प्रतिनिधित्व मिळाल्याने आगामी विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेस कार्यकर्त्यांच्या संघटन वाढीला वाव मिळणार आहे. 


हिंगोली शहरात काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष


आमदार प्रज्ञाताई सातव यांच्या विजयामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांनी हिंगोली शहरात जल्लोष केला. फटाके वाजवून आणि पेढे वाटून कार्यकर्त्यांनी आनंद साजरा केला. विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या प्रज्ञाताई सातव या एकमेव उमेदवार होत्या.


विधान परिषदेत 26 मतांनी आमदार प्रज्ञाताई सातव विजयी


नुकत्याच झालेल्या विधान परिषद निवडणुकीत हिंगोलीच्या काँग्रेसच्या उमेदवार आमदार प्रज्ञाताई सातव या 26 मतांनी विजयी झाल्या. या निवडणुकीत विजयासाठी त्यांना 23 मतांची आवश्यकता होती.


2021 मध्ये काँग्रेसने प्रज्ञाताई सातव यांना उमेदवारी दिल्यानंतर त्या निवडून आल्या होत्या. पण केवळ अडीच वर्षांच्या कार्यकाळात जी कामे राहून गेली ती या कार्यकाळात त्यांना पूर्ण करता येणार आहेत.


हेही वाचा:


Prakash Ambedkar : संविधानावर खरचं प्रेम असेल, तर नरेंद्र मोदी आणि राहुल गांधींनी मनुस्मृती जाळावी; प्रकाश आंबेडकरांचे आव्हान!


Prakash Ambedkar on Congress : विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेसची 8 मतं फुटली, प्रकाश आंबेडकरांनी तोफ डागली, हल्लाबोल करत म्हणाले...


Vidhan Parishad Election Result 2024: विधानपरिषद निवडणुकीचा निकाल जाहीर, कोणाकोणाचा विजय? जाणून घ्या एका क्लिकवर