Kolhapur : कोल्हापुरात पोस्टवरून वाद निर्माण झाला आहे. मंत्री हसन मुश्रीफ यांच्या वाढदिवसाच्या बॅनरवरुन वाद निर्माण झाला आहे. मुश्रीफ यांचं नाव प्रभु रामांचं नाव जोडल्याने मुश्रीफांवर भाजपने जोरदार टीका केली आहे. भाजप जिल्हाध्याक्ष समरजीत घाटगे यांनी मुश्रीफआंचा जन्म रामनवमीला झाल्याचा दावा खोटा असल्याचं म्हटलं आहे. मुश्रीफांचा जन्म रामनवमीला नाही तर रंगपंचमीला झाला, असं म्हणत मुश्रीफांवर निशाणा साधला आहे.


समरजीत घाटगे यांनी यावेळी म्हटलं, मुश्रीफ यांनी सांगितलं होतं की 1954 ला त्यांचा जन्म रामनवमीला झाला हे खोटं आहे. तुम्ही 40 वर्ष जनतेशी खोटं बोलले आहे मुश्रीफांचा जन्म 24 मार्च 1954 रोजी झाला. त्या दिवशी रामनवमी नाही तर रंगपंचमी होती.' यावेळी बँकेला सादर केलेले पुरावे घाटगेंकडून सादर करण्यात आले.


दरम्यान, समरजित घाटगे यांच्या आरोपांना मुश्रीफ यांनी सडेतोड उत्तर दिलंय. हे सगळं प्रकरण समरजित घाटगे यांना महागात पडणार असा इशारा मुश्रीफ यांनी दिला आहे. 'मी माझ्या कार्यकर्त्यांना संयम राखण्याचं आवाहन केलं आहे. अन्यथा ते आमच्या पासंगाला देखील पुरणार नाहीत', असं देखील दम मुश्रीफ यांनी दिलाय. 'गेल्या 50 वर्षांपासून मी रामनवमीला वाढदिवस साजरा करतोय. मग आताच यांच्या पोटात का दुखत आहे', असा सवाल देखील केला आहे. सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्मलेल्या व्यक्तीला राजकारण काय कळणार असा टोलादेखील मुश्रीफ यांनी लगावला आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha