एक्स्प्लोर

हर्षवर्धन सपकाळांकडून शिवप्रेमींची दिलगिरी; भाजपचा खोडसाळपणा म्हणत वक्तव्याचा अर्थही समजावला

हर्षवर्धन सकपाळ यांनी शिवाजी महाराजांबद्दल गौरवोद्गार काढताना टिपू सुलतानच्या कार्याचेही कौतुक केले होते.

मुंबई : राज्यात शिवजयंतीची जल्लोष आणि उत्साहात तयारी सुरू असून शिवप्रेमी, शिवभक्त तयारीला लागले आहेत. मात्र, दोन दिवसांपूर्वी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतानची तुलना शिवाजी महाराजांबद्दल (shivaji maharaj) केल्याच्या वक्तव्यावरुन चांगलाच वाद सुरू झाला. भाजप नेते, आमदारांकडून हर्षवर्धन सपकाळ (Harshwardhan sapkal) यांच्यावर टीका करत काँग्रेसचा खरा चेहरा हाच आहे, काही विशिष्ट समुदायाच्या व्होट बँकेसाठी हर्षवर्धन सपकाळ असं बोलतात असेही सत्ताधाऱ्यांनी म्हटले. मात्र, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला, भाजपने जाणीवपूर्वक खोडसाळपणा केल्याचं हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलं आहे. तसेच, आपल्या वक्तव्याने काही शिवप्रेमी बांधवांच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो, असेही सपकाळ यांनी म्हटले. 

हर्षवर्धन सकपाळ यांनी शिवाजी महाराजांबद्दल गौरवोद्गार काढताना टिपू सुलतानच्या कार्याचेही कौतुक केले होते. तसेच, शिवाजी महाराजांची तुलना टिपू सुलतानसोबत केल्याचं दिसून आलं. मात्र, भाजपने खोडसाळपणा करत चुकीच्या पद्धतीने माझे वक्तव्य पसरवल्याचे सांगत आपल्या वक्तव्याबद्दल हर्षवर्धन सपकाळ यांनी शिवप्रेमीप्रती केली दिलगिरी व्यक्त केली आहे. 

दोन दिवसांपूर्वी हर्षवर्धन सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना टिपू सुलतान सोबत केली या वक्तव्यामुळे राज्यभरात गदारोळ निर्माण झाला होता. त्यानंतर, हर्षवर्धन सपकाळ यांना धमक्याही मिळाल्या होत्या तर काही शिवप्रेमी थेट हर्षवर्धन सपकाळ यांच्या निवासस्थानी सुद्धा दाखल झाले होते. त्या अनुषंगाने हर्षवर्धन सपकाळ यांनी फेसबुक पोस्ट करत "भाजपचा तीव्र शब्दात निषेध करत त्यांच्या गलिच्छ व खोडसाळपणामुळे काही शिवप्रेमी बांधवांच्या भावना दुखावल्या गेल्.या त्याबद्दल मी मनःपूर्वक खेद व्यक्त करतो, माझ्या शब्दाचा गैरवापर केल्याबद्दल शिवप्रेमीं प्रति दिलगिरी व्यक्त करतो व कुणाच्याही भावनांना ठेच पोहोचण्याचा माझा हेतू नव्हता" अशा प्रकारची फेसबुक पोस्ट सपकाळ यांनी केली आहे. तसेच, आपल्या पोस्टमध्ये अंभागातील काही ओळीही दिल्या आहेत. भले तरि देऊं कासेची लंगोटी । नाठाळाचे माथी हाणू काठी । असे तुकाराम महाराजांच्या अभंगातील ओळीतून सपकाळ यांनी संदेश दिलाय. 

कठीण वज्रास भेदूं ऐसे
भले तरि देऊं कासेची लंगोटी ।
नाठाळाचे माथी हाणू काठी ।
मायबापाहूनि बहु मायावंत ।
करूं घातपात शत्रूहूनि ॥
अमृत तें काय गोड आम्हांपुढें ।
विष तें बापुडें कडू किती ॥

हेही वाचा

'ठाणे की रिक्षा'वाला कुणाला कामरा विधानभवनात; सोबत सुषमा अंधारे अन् वकील, अंगावर लक्षवेधी टी-शर्ट

महत्त्वाच्या बातम्या

अजितदादांना न्याय कधी मिळणार? राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेर काँग्रेसचं आंदोलन, सूरज चव्हाणांसोबत बाचाबाची, पोलीस घटनास्थळी
अजितदादांना न्याय कधी मिळणार? राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेर काँग्रेसचं आंदोलन, सूरज चव्हाणांसोबत बाचाबाची, पोलीस घटनास्थळी
कुणबी प्रमाणपत्र घेऊन ओबीसी जागेवर निवडणूक लढवणाऱ्यांना माझं समर्थन नाही; मनोज जरांगे पाटलांचं मोठं वक्तव्य 
कुणबी प्रमाणपत्र घेऊन ओबीसी जागेवर निवडणूक लढवणाऱ्यांना माझं समर्थन नाही; मनोज जरांगे पाटलांचं मोठं वक्तव्य 
रावसाहेब दानवेंनी आता राज्यपाल व्हावं, आमदार लोणीकरांचं सूचक वक्तव्य, म्हणाले मला परभणीतून खासदार व्हायचंय
रावसाहेब दानवेंनी आता राज्यपाल व्हावं, आमदार लोणीकरांचं सूचक वक्तव्य, म्हणाले मला परभणीतून खासदार व्हायचंय
Narendra Patil : एमडींना अण्णासाहेब पाटील महामंडळाचे वाटोळे करण्याची सुपारी; नरेंद्र पाटील यांचा गंभीर आरोप, अध्यक्षपद सोडण्याचे संकेत
एमडींना अण्णासाहेब पाटील महामंडळाचे वाटोळे करण्याची सुपारी; नरेंद्र पाटील यांचा गंभीर आरोप, अध्यक्षपद सोडण्याचे संकेत

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Arunachal Pradesh Dispute : चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
Lok Sabha Monsoon Session : संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
Mecca Deal : पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया
पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
Rahul Gandhi : भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
Gold Rate : पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
Ratnagiri News : रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
Embed widget