Dindori Lok Sabha constituency : भारतीय जनता पक्षाने शिंदे गटाला सोबत घेऊन महाराष्ट्रात सत्तास्थापन केली. त्यानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीलाही (NCP Ajit Pawar) युतीमध्ये सामील करुन घेतले. मात्र, लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपला बंडखोरीला तोंड द्यावे लागणार आहे. कारण अजित पवार आणि एकनाथ शिंदेंच्या पक्षाला कमी जागा सुटल्या. त्यामुळे दोन्ही पक्षातील अपक्ष नेते आणि शिवाय भाजपमधील संधी मिळाली नसल्याने नाराज झालेले नेत्यांकडून बंडखोरी होण्याची शक्यता आहे. याची सुरुवात दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून झाली आहे.


माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी 


भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण (Harishchandra Chavan) बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढणार आहेत. दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून ते उमेदवारी अर्ज भरणार आहेत. भाजपने केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार यांना उमेदवारी दिल्यानंतर हरिश्चंद्र चव्हाण (Harishchandra Chavan) नाराज झाले होते. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडूनही उमेदवारीसाठी केला होता. मात्र, आज शरद पवारांच्या राष्ट्रवादीने दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून भास्कर भगरे यांना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे हरिश्चंद्र चव्हाण यांच्या पक्षाकडून निवडणूक लढवण्याच्या इच्छेला तडा गेलाय. 






हरिश्चंद्र चव्हाण भारती पवारांची बंडखोरी वाढवणार 


राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटांनीही भास्कर भगरे यांना उमेदवारी दिल्याने हरिश्चंद्र चव्हाण (Harishchandra Chavan) अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार आहेत. हरिश्चंद्र चव्हाण यांनी दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी केल्यास भाजपाचा भारती पवार यांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. हरिश्चंद्र चव्हाण यांच्यामुळे मतविभाजन होऊ शकते. याचा अप्रत्यक्ष फायदा शरद पवारांच्या राष्ट्रवादीला होऊ शकतो. भाजपने विद्यमान खासदार असताना हरिश्चंद्र चव्हाण याना डावलून 2019 मध्ये भारती पवार यांना उमेदवारी दिली होती. 


कोण आहेत हरिश्चंद्र चव्हाण?


हरिश्चंद्र चव्हाण (Harishchandra Chavan) सलग दोन वेळेस दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून निवडून आले होते. 2019 मध्ये त्यांच्याकडे हॅटट्रीक करण्याची संधी होती. मात्र, भारतीय जनता पक्षाने त्यांना उमेदवारी नाकारली होती. निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या डॉ. भारती पवार यांना भाजपने उमेदवारी दिली होती. 2014 मध्ये हरिश्चंद्र चव्हाण यांनीच भारती पवार यांचा दारुण पराभव केला होता. 


इतर महत्वाच्या बातम्या 


Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांच्या भाषणावेळी पाऊस सुरु होताच सातारच्या सभेच्या आठवणी जाग्या; कार्यकर्ते म्हणाले, हा विजयाचा शुभसंकेत!