एक्स्प्लोर

Harbhajan Singh On West Bengal Election Result 2026: भाजपमध्ये जाताच शांत राहिला; काल बंगालाचा निकाल लागताच धडाधड बोलला; हरभजन सिंग काय काय म्हणाला?

Harbhajan Singh On West Bengal Election Result 2026: पश्चिम बंगालमधील भाजपच्या विजयानंतर हरभजन सिंगने एक्सवर पोस्ट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे कौतुक केले आहे. 

Harbhajan Singh On West Bengal Election Result 2026: पश्चिम बंगालमध्ये भाजपनं ऐतिहासिक विजय मिळवला. जनसंघाचे संस्थापक श्यामाप्रसाद मुखर्जींच्या जन्मभूमीत भाजपचा सत्तेचा 74 वर्षांचा वनवास अखेर संपुष्टात आलं. तर तृणमुल काँग्रेसच्या 15 वर्षांच्या सत्तेला भाजपनं सुरुंग लावला. 2011 पासून पश्चिम बंगालचा गड ममता बॅनर्जींनी निर्विविदादपणे राखला होता. मात्र स्पष्ट बहुमताच्या जोरावर भाजपनं बंगालमध्ये एकहाती सत्ता मिळवली. बंगालमध्ये 293 जागांपैकी भाजपने 207 जागा जिंकल्या. पश्चिम बंगालमधील विजयानंतर टीम इंडियाचा माजी खेळाडू आणि नुकेतच आपमधून भाजपमध्ये प्रवेश केलेले राज्यसभेचे खासदार हरभजन सिंग याने सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. भाजपप्रवेशानंतर हरभजन सिंगने आतापर्यंत कोणतीच प्रतिक्रिया दिली नव्हती. मात्र काल पश्चिम बंगालमधील भाजपच्या विजयानंतर हरभजन सिंगने एक्सवर पोस्ट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे कौतुक केले आहे. 

बंगालमध्ये नेहमीच अफाट क्षमता राहिली आहे, परंतु अनेक वर्षे ते मागे राहिले. बंगालमधील जनता आता प्रगती, विकास आणि बदलासाठी सज्ज आहे. बंगालचा तेजमय होण्याचा काळ आता आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपच्या संपूर्ण टीमचे मनःपूर्वक अभिनंदन...आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत, असं हरभजन सिंग म्हणाला.

हरभजन सिंगचा भाजपमध्ये प्रवेश- (Harbhajan Singh On BJP)

पंजाबमधील आम आदमी पक्षाचे 10 पैकी 7 राज्यसभा खासदार राघव चड्ढा, स्वाती मालीवाल, हरभजन सिंग, संदीप पाठक, अशोक मित्तल, राजेंद्र गुप्ता आणि विक्रमजीत साहनी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. हा अरविंद केजरीवाल यांच्यासाठी मोठा झटका असून, या विलीनीकरणाला राज्यसभेच्या सभापतींनी मंजुरी दिली आहे, ज्यामुळे भाजपचे राज्यसभेतील संख्याबळ 113 वर पोहोचले आहे

ममता बॅनर्जी यांनाही पराभवाचा करावा लागला सामना- (West Bengal Election Result 2026)

पश्चिम बंगालमधील भवानीपूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा राजकीय नाट्य रंगताना दिसलं. तृणमूल काँग्रेसच्या 15 वर्षांच्या सत्तेला धक्का बसत असतानाच ममता बॅनर्जींना पराभवाचा सामना करावा लागलाय. टीएमसीच्या एजंटला बाहेर काढल्याचा आरोप करत ममता बॅनर्जी आणि सुवेंदू अधिकारी जवळपास दोन तास मतमोजणी केंद्रात ठिय्या देऊन बसले होते. सीएपीएफच्या जवानांकडून मारहाण झाल्याचा गंभीर आरोपही ममता बॅनर्जी यांनी केला आहे. अखेर भवानीपूर मतदारसंघातून सुवेंदू अधिकारी यांनी सुमारे 15 हजार मतांनी विजय मिळवला. मतमोजणी उशिरापर्यंत चालल्याचंही चित्र होतं, आणि या पार्श्वभूमीवर आज सायंकाळी 4 वाजता ममता बॅनर्जी पत्रकार परिषद घेणार आहेत.

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2019 पासून लोकमत ऑनलाईनमधून पत्रकारितेची सुरुवात. राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा, क्राईम, क्रीडा, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस. 

Read More

महत्त्वाच्या बातम्या

अजितदादांना न्याय कधी मिळणार? राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेर काँग्रेसचं आंदोलन, सूरज चव्हाणांसोबत बाचाबाची, पोलीस घटनास्थळी
अजितदादांना न्याय कधी मिळणार? राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेर काँग्रेसचं आंदोलन, सूरज चव्हाणांसोबत बाचाबाची, पोलीस घटनास्थळी
कुणबी प्रमाणपत्र घेऊन ओबीसी जागेवर निवडणूक लढवणाऱ्यांना माझं समर्थन नाही; मनोज जरांगे पाटलांचं मोठं वक्तव्य 
कुणबी प्रमाणपत्र घेऊन ओबीसी जागेवर निवडणूक लढवणाऱ्यांना माझं समर्थन नाही; मनोज जरांगे पाटलांचं मोठं वक्तव्य 
रावसाहेब दानवेंनी आता राज्यपाल व्हावं, आमदार लोणीकरांचं सूचक वक्तव्य, म्हणाले मला परभणीतून खासदार व्हायचंय
रावसाहेब दानवेंनी आता राज्यपाल व्हावं, आमदार लोणीकरांचं सूचक वक्तव्य, म्हणाले मला परभणीतून खासदार व्हायचंय
Narendra Patil : एमडींना अण्णासाहेब पाटील महामंडळाचे वाटोळे करण्याची सुपारी; नरेंद्र पाटील यांचा गंभीर आरोप, अध्यक्षपद सोडण्याचे संकेत
एमडींना अण्णासाहेब पाटील महामंडळाचे वाटोळे करण्याची सुपारी; नरेंद्र पाटील यांचा गंभीर आरोप, अध्यक्षपद सोडण्याचे संकेत

व्हिडीओ

Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
Gold Rate : पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
Ratnagiri News : रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
Prithviraj Chavan: इकडं संजय राऊतांचे केंद्रीय शिक्षण मंत्रीपदासाठी फडणवीसांवरून दाव्यांवर दावे, पण पृथ्वीराजबाबांनी मांडली वेगळीच भूमिका! थेट म्हणाले, 'त्यांना केंद्रात संधी मिळाल्यास देशातील Gen Z आणि काँग्रेस...'
इकडं संजय राऊतांचे केंद्रीय शिक्षण मंत्रीपदासाठी फडणवीसांवरून दाव्यांवर दावे, पण पृथ्वीराजबाबांनी मांडली वेगळीच भूमिका! थेट म्हणाले, 'त्यांना केंद्रात संधी मिळाल्यास देशातील Gen Z आणि काँग्रेस...'
SC-ST आरक्षणात 'क्रिमी लेयर'चे तत्त्व लागू होत नाही, ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणांना लागू; केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
SC-ST आरक्षणात 'क्रिमी लेयर'चे तत्त्व लागू होत नाही, ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणांना लागू; केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
Abhijeet Dipke: 'मी कुणाला भेटायचं हे पोलिसांनी नाही सांगायचं'; अभिजीत दिपके पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, Video
'मी कुणाला भेटायचं हे पोलिसांनी नाही सांगायचं'; अभिजीत दिपके पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, Video
Sushma andhare: तर शिंदेंना फडणवीस भूमिका घेऊ देतील? मग ते फडणवीस कसले? दोघांच्या कोल्ड वॉरमध्ये जीव मात्र गरीब मराठ्यांचा जातोय; सुषमा अंधारेंचा प्रहार
तर शिंदेंना फडणवीस भूमिका घेऊ देतील? मग ते फडणवीस कसले? दोघांच्या कोल्ड वॉरमध्ये जीव मात्र गरीब मराठ्यांचा जातोय; सुषमा अंधारेंचा प्रहार
Embed widget