एक्स्प्लोर

Harbhajan Singh: पंजाब सरकारने सुरक्षा काढली; आता केंद्र सरकारकडून हरभजन सिंगच्या सुरक्षेसाठी CRPF कमांडो तैनात; 'आप'मधून भाजपमध्ये आलेल्या इतर खासदारांनाही मिळाली सुरक्षा

Harbhajan Singh: केंद्रीय गृह मंत्रालयाने माजी क्रिकेटपटू आणि राज्यसभा खासदार हरभजन सिंग (harbhajan singh) यांच्याबाबत मोठा निर्णय घेतला आहे.

नवी दिल्ली: पंजाब सरकारने सुरक्षा काढून घेतल्यानंतर अवघ्या काही तासांतच केंद्रीय गृह मंत्रालयाने हरभजन सिंग (harbhajan singh) आणि इतर बंडखोर खासदारांना CRPF ची सुरक्षा प्रदान केली आहे. हरभजन सिंग (harbhajan singh) यांच्या घराबाहेर 'गद्दार' असे लिहून वाढता विरोध पाहता केंद्र सरकारने हे पाऊल उचलले आहे. आता हे सर्व नेते दिल्ली आणि पंजाबमध्ये केंद्रीय सुरक्षा कवचाखाली राहतील.(harbhajan singh) 

केंद्रीय गृह मंत्रालयाने माजी क्रिकेटपटू आणि राज्यसभा खासदार हरभजन सिंग (harbhajan singh) यांच्याबाबत मोठा निर्णय घेतला आहे. पंजाब सरकारने सुरक्षा मागे घेतल्यानंतर केंद्र सरकारने हरभजन सिंग (harbhajan singh) यांना CRPF ची सुरक्षा पुरवली आहे. आता 'टर्बनेटर'ला दिल्ली आणि पंजाब या दोन्ही ठिकाणी केंद्रीय सुरक्षा दलांचे कवच मिळेल आणि सीआरपीएफचे कमांडो त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात असतील.

गृह मंत्रालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हरभजन सिंग यांच्यासह आम आदमी पार्टीतून भाजपमध्ये आलेल्या इतर खासदारांनाही- संदीप पाठक, अशोक मित्तल, स्वाती मालीवाल, राजेंद्र गुप्ता आणि विक्रमजीत साहनी यांना केंद्रीय सुरक्षा देण्यात आली आहे. या सर्व नेत्यांना आता CRPF चे कमांडो सुरक्षा प्रदान करतील. या नेत्यांवरील वाढता धोका आणि पंजाबमधील त्यांच्या निवासस्थानाबाहेर सुरू असलेली निदर्शने लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.

harbhajan singh : पंजाब सरकारने हटवली होती सुरक्षा

यापूर्वी आजच पंजाबच्या भगवंत मान सरकारने हरभजन सिंग यांची Z+ श्रेणीतील सुरक्षा काढून घेतली होती. त्यांच्या जालंधर येथील निवासस्थानावरून ९-१० सुरक्षा रक्षक आणि सरकारी गाड्या परत बोलावण्यात आल्या होत्या. याला स्वतः हरभजन सिंग यांचे पीए मनदीप सिंह यांनी दुजोरा दिला होता.

शनिवारी हरभजन यांच्या घराबाहेर मोठा गदारोळ झाला होता आणि आंदोलकांनी त्यांच्या घराच्या भिंतीवर काळ्या स्प्रेने 'पंजाबचा गद्दार' असे लिहिले होते. धक्कादायक बाब म्हणजे, समोर आलेल्या व्हिडिओमध्ये पोलीस तिथे उभे असल्याचे दिसत होते, मात्र त्यांनी आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न केला नाही.

मुख्यमंत्री भगवंत मान यांनी पक्ष सोडणाऱ्या खासदारांवर थेट हल्ला चढवत त्यांना 'गद्दार' म्हटले आणि या नेत्यांनी पंजाबच्या जनतेचा विश्वास तोडला असल्याचे सांगितले. खरं तर, AAP सोडून भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या खासदारांबाबत बोलताना राघव चड्ढा यांनी म्हटले होते की, 'आप'चे ७ खासदार भाजपमध्ये सामील होत आहेत. राघव चड्ढा यांच्यासह संदीप पाठक आणि अशोक मित्तल यांनी भाजपचे सदस्यत्व घेतले होते. त्यानंतर स्वाती मालीवाल आणि विक्रमजीत साहनी यांनीही भाजपमध्ये सामील झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला होता.

महत्त्वाच्या बातम्या

ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
Udhayanidhi Stalin on Trisha Krishnan: त्रिशावरील वक्तव्य, उदयनिधी स्टॅलिन यांना ताब्यात घेण्यासाठी घरी पोहोचले, पत्नी म्हणाली, 10 मिनिटं थांबा, ते टॉयलेटमध्ये आहेत
त्रिशावरील वक्तव्य, उदयनिधी स्टॅलिन यांना ताब्यात घेण्यासाठी घरी पोहोचले, पत्नी म्हणाली, 10 मिनिटं थांबा, ते टॉयलेटमध्ये आहेत

व्हिडीओ

Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
Embed widget