Gulab Patil on Sanjay Raut, मुंबई  : "या राज्यात 20 वर्षांपासून मी आमदार आहे. मी सुद्धा बरेच मुख्यमंत्री पाहिले. एक वर्षात 14 वेळेस मुख्यमंत्री कोणी जिल्ह्यात आणायचं काम केलं असेल तर ते एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. कावळा कितीही उचीवर गेला तरी तो कबूतर बनत नाही, हे मी संजय राऊतला सांगतोय. कोण जिंकणार आणि कोण हारणार हे तर वेळ सांगेन", असे मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले. ते शिंदेंच्या मुंबईतील दसरा मेळाव्यात बोलत होते. 


गुलाबराव पाटील म्हणाले, शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे काय बोलतात? याची आम्ही शिवसैनिक चातकाप्रमाणे वाट पाहायचो. आज शिवसैनिकांना निश्चितपणाने शिवसेनाप्रमुखांची आठवण येते आहे. एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री झाल्यानंतर दोन वर्षाचा काळ आपण पाहिला आहे. लोकसभेच्या निवडणुकीनंतर राज्यात काहीतरी चुकीचं होतंय असं चित्र आहे, असं चित्र या राज्यात निर्माण केलं गेलं. आता पुढे काय यांचं सरकार येणार नाही, असं सांगितलं. पण शिंदे साहेबांनी जादू चालवलीये. 


पुढे बोलताना गुलाबराव पाटील म्हणाले, लाडके मुख्यमंत्री आणि लाडक्या बहिणीचे भाऊ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत. 40  वर्षापासून होत असलेल्या मेळाव्याची आठवण होते. आज शिवसैनिकांना बाळासाहेब याची आठवण नक्की होत असेल. आम्ही साहेब कधी बोलणार याची वाट पाहत होतो. लोकसभा निवडणूक झाल्यावर वेगळं चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न केला.  आता सरकार येणार नाही अस सांगण्यात आल,पण शिंदे साहेब यांनी जादू केली. 


माझ्या जिल्ह्यात सी एम साहेब दोन वर्षात 14 वेळा आलेले पहिले मुख्यमंत्री आहेत. लोकसभेमध्ये वेगळं काही मुस्लिम लोकांना सांगण्यात आलं,दलितांना सागितले घटना बदलली जाणार आहे. आमच्या मुख्यमंत्री यांनी पहिल्याच लोकसभामध्ये सात लोकसभा उमेदवार निवडून आणले. आमचा मुख्यमंत्री कॉमन मॅन आहेत. आता बहिणी निवडणूकीत सगळे कार्यक्रम करणार,पैसे दिले आपल्या बहिणींना,यामुळे बऱ्याच लोकांना चिंता वाटू लागली आहे,असा कुठला वर्ग नाही ज्या वर्गाचं काम मुख्यमंत्री यांनी केलं नाही. 


 मला खात्री आहे, लोकसभेमध्ये जे नेगेटीव्ह पसरवलं गेलं. मुस्लिमांना सांगितलं गेलं, यांचं सरकार आलं तर तुमचं काही खर नाही. मोदींचं सरकार 400 पार गेलं तर तुमचं काही खरं नाही, असं सांगितलं गेलं. बाळासाहेब ठाकरे याचा नम्र शिपाई म्हणून बोलत आहेत.  त्यानी हिंदुत्व सोडलं आहे. मुसलमान विरोधी आम्ही नाही. भगवा झेंडा आपला शान आहे. निवडणुकीला फक्त 45 दिवस शिल्लक आहे,आपण केलेली कामाचा प्रचार केला,तरी आपल्याला मदत होणार आहे. काँग्रेस एन सी पी आणि उबाठाचा सत्यानाश करो, असंही पाटील म्हणाले. 


इतर महत्त्वाच्या बातम्या 


Shiv Sena Dasara Melava : फडणवीसांनी नागपूरचा बंगला किंवा शिंदेंनी तापोळ्याची जमीन विकून 1500 रुपये दिले नाहीत, हे आमच्या कष्टाच्या टॅक्सचे : सुषमा अंधारे