मुंबई : लाडक्या बहिणीला 1500 रुपये आपल्या खिशातले दिले असल्याचा अविर्भाव राज्य सरकारचा आहे. पण फडणवीसांनी नागपूरचा बंगला किंवा शिंदेंनी तापोळ्याची जमीन विकून 1500 रुपये दिले नाहीत, हे आमच्या कष्टाच्या टॅक्सचे पैसे आहेत अशी घणाघाती टीका शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केली. आपल्या टॅक्सचे पैसेच आपल्याला परत मिळत असल्याने महिलांनी हे पैसे घ्यावेत असं आवाहनही त्यांनी राज्यातील महिलांना केलं. सुषमा अंधारे या शिवसेना ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्यात बोलत होत्या. 


सुषमा अंधारे म्हणाल्या की, राज्य सरकारकडून देण्यात येत असलेले 1500 रुपये हे आपल्या खिशातून दिले जात असल्याचा अविर्भाव महायुतीच्या नेत्यांचा आहे. पण आमच्याकडून जे टॅक्सच्या रुपात पैसे घेतले जातात तेच पैसे आपल्याला परत केले जात आहेत. देवेंद्र फडणवीसांनी नागपूरचा बंगला किंवा शिंदेंनी तापोळ्याची जमीन विकून 1500 रुपये दिले नाहीत. त्यामुळे हे पैसे लाडक्या बहिणींनी घ्यावेत. 


शिंदेंनी महापुरुषांचे राजकारण केलं


एकनाथ शिंदेंनी महापुरुषांचं राजकारण केलं, धार्मिक दंगली घडवायला शांतिगिरी महाराजांच्या पाठीशी उभे राहिले असा आरोप सुषमा अंधारे यांनी केला. त्या म्हणाल्या की, शिंदे साहेब तुम्ही महापुरुषांचं राजकारण केलं. तुम्हाला एकही आंदोलन हाताळता आलं नाही. शिंदे साहेब तुम्ही ठरवून धार्मिक दंगली घडवून आणल्या. धार्मिक दंगली घडवायला शांतिगिरी महाराजाच्या पाठीशी उभे राहिलात. 


10 वर्षांपूर्वी, 2014 साली देवेंद्र फणवीसांनी नरेंद्र मोदी यांच्या हस्ते इंदू मिलची कुदळ मारली. गेल्या 10 वर्षात बाबासाहेब आंबेडकर स्मारकाची एक वीटही रचली नाही. याच्या उलट फडणवीसांनी दीक्षाभूमीचं खोदकाम केलं. यांची अघोरी भूक संपत नाही. अरबी समुद्रातील स्मारक उभं केलं नाही. 


शिंदे साहेबांनी छत्रपतींच्या पायाशी जाऊन शपथ घेतली. ताशी 45 किमीच्या वाऱ्याने कोकणातील नारळाची झाडं का पडली नाहीत? त्या आपटेला तुम्ही सहजसोडून देता अशी घणाघातील टीका सुषमा अंधारे यांनी केली. 


लोकसभा निवडणुकीला रामाने भाजपला चितपट केलं, आता विधानसभेला शिवाजी महाराज आणि मावळे यांना धूळ चारतील असा टोला सुषमा अंधारे यांनी लगावला. फडणवीसंनी अंतकरणावर, मनावर हात ठेवा आणि सांगावं, फेक नरेटिव्हचं महानिर्मिती केंद्र तुम्ही स्वतः आहेत अशी टीकाही त्यांनी केली. 


ही बातमी वाचा: