Gulabrao Patil on Ajit Pawar : विधानसभेला (Vidhansabha) आम्ही केवळ 85 जागा लढलो होतो. कदाचित अजितदादा आमच्यामध्ये आले नसते तर त्या जागा आम्हाला मिळाल्या असत्या. त्यामुळं आमच्या 90 ते 100 जागा आल्या असत्या असं वक्तव्य शिवसेना शिंदे गटाचे आमदार गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी केलं. अजितदादांना घेतल्यानंतरही आमच्या नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी कधी म्हटलं नाही की यांना का घेतले. असा आमचा नेता असल्याचे पाटील म्हणाले. कोणी काहीही म्हणत असेल तर त्यात काही तथ्य नाही असंही गुलबाराव पाटील म्हणाले. 


आमचा नेता दिलदार मनाचा माणूस, ते नाराज नाहीत 


विधान सभा निवडणुकीचा निकाल लागून 8 दिवस झाले असले तरी महायुतीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा अद्याप निश्चित झालेला नाही. सरकार कधी स्थापन होणार? मुख्यमंत्री कोण असणार? गुलाबराव पाटील यांना कोणती जबाबदारी देण्यात येणारय़ या सगळ्या प्रश्नांच्या संदर्भात गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. येत्या 5 डिसेंबरला मंत्रीमंडळ स्थापन होईल अशी माहिती आपल्याला माध्यमातून मिळाली आहे. मुख्यमंत्री कोण असणार? याबाबत भाजपचे  वरिष्ठ नेते  ठरवणार आहेत. यामधे आपली कोणतीही अडचण नसल्याचे एकनाथ शिंदे यांनी अगोदरच स्पष्ट केल्याचे गुलाबराव पाटील म्हणाले. त्यामुळं ते नाराज आहेत असं नाही. जे यश कधी मिळाले नसेल अस यश त्यांनी खेचून आणलं आहे. ते एक लढणारा नेता आहेत. ते कधीही नाराज होऊ शकत नाहीत असे गुलाबराव पाटील म्हणाले. त्यांनी ज्या पद्धतीने मेहनत केली आहे, त्याच फळ मिळालं अशी प्रत्येकाची इच्छा असते. त्यामुळे थोडी नाराजी त्यांच्या मनात असू शकेल. मात्र, आमचा नेता दिलदार मनाचा माणूस आहे, नाराज राहणार नाही असे गुलाबराव पाटीव म्हणाले. 


आमचे सगळे अधिकार एकनाथ शिंदेंना 


आमचे सगळे अधिकार एकनाथ शिंदे यांना देण्यात आले आहेत, ते काय निर्णय घेतील तो आम्हला मान्य राहणार असल्याचे गुलाबराव पाटील म्हणाले. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री कोण असावा? याबाबत भाजपाने निर्णय घ्यावा असं म्हटलं आहे. त्यामुळं हा भाजपा पक्षश्रेष्ठींचा विषय असल्याचे गुलाबराव पाटील म्हणाले. अडीच वर्षात एकनाथ शिंदे यांनी जनेतेत आपला नावलौकिक मिळवला असल्याचे गुलाबराव पाटील म्हणाले. 


एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री व्हावं अशी आमची सगळ्या आमदारांची इच्छा


दरम्यान, ईव्हीएमबाबत बोलणे म्हणजे रडीचा डाव असल्याचे गुलाबराव पाटील म्हणाले. आपल्या मंत्री पदाबाबत आपण कोणताही आग्रह केला नाही. फुल पट्टी घेऊन मोजमाप करणारा आपला नेता आहे असे गुलाबराव पाटील म्हणाले. एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री व्हावं अशी आमची सगळ्या आमदारांची इच्छा असल्याचे गुलाबराव पाटील म्हणाले. संजय राऊतांमुळं शिवसेना संपली, शरद पवार संपले आणि आता तेही संपणार असल्याचं गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे. 


महत्वाच्या बातम्या:


मोठी बातमी : एकनाथ शिंदेंच्या उपमुख्यमंत्रिपदाबाबत पहिल्यांदाच शिंदे गटाच्या नेत्याचं जाहीर वक्तव्य, म्हणाले...