Gopichand Padalkar met Amit Shah : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) हे दोन दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर आले होते. 11 एप्रिलला रात्री अमित शाह हे पुण्यात (Pune) दाखल झाले. यावेळी रात्री उशिरा भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची पुण्यात भेट घेतल्याची माहिती मिळत आहे. मे महिन्यात अहिल्याबाई होळकर (Ahilyabai Holkar) यांच्या जयंतीच्या त्रिशताब्दी वर्षानिमित्त भव्य कार्यक्रमाचे आयोजन पुण्यात करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे निमंत्रण पडळकर यांनी अमित शाह यांना दिले आहे. तर अमित शाह यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे वचन दिल्याची माहिती गोपीचंद पडळकर यांनी दिली आहे.  

Continues below advertisement


याबाबत गोपीचंद पडळकर यांनी एक्सवर पोस्ट करत माहिती दिली आहे. ते म्हणाले की, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. त्यांच्या व्यक्तिमत्त्वात असणाऱ्या हिमालयाच्या दृढतेची अनुभूती मिळाली. गृहमंत्री म्हणून त्यांनी कलम ३७० हटवले, CAA, NRC ची गरज या देशाला पटवून दिले, अंमलबजावणी केली. हे निर्णय फक्त शासकीय धोरणापुरते मर्यादित नाहीत. हिंदू राष्ट्रनिर्मितीच्या दिशेनं ठाम पाऊलं आहेत.






गोपीचंद पडळकरांना अमित शाहांचं वचन   


पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचं त्रिशताब्दी वर्ष आहे. भाजप व संघ परिवाराने देशभरात 12 हजार विविध कार्यक्रम आणि उपक्रमांचे आयोजन केलंय. अहिल्यादेवींनी ‘राष्ट्रप्रथम’ हा मंत्र मनी बाळगला. दौलतीपलीकडे जात राष्ट्रउभारणी केली. त्यांच्या त्रिशताब्दी जयंतीच्या पर्वावर एका विशेष कार्यक्रमाचे नियोजन केले आहे, त्यासाठी मा. अमितभाई शहा यांची भेट घेऊन निमंत्रण दिले. त्यांनी तात्काळ होकार दिला. सोबत राज्याचे लोकप्रिय व लाडके आमचे मुख्यमंत्री देवाभाऊ आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीही पुण्यश्लोक अहिल्यामातेच्या त्रिशताब्दी जयंती निमित्ताने आपला संकल्प बोलवून दाखवला. यंदाची जयंती अभूतपूर्व असेल याची ग्वाही देतो. चांगभलं..., असे गोपीचंद पडळकर यांनी म्हटले आहे. 



आणखी वाचा 


रायगडाला पर्यटन नव्हे प्रेरणास्थळ बनवू, अमित शाहांचा शब्द, राजेंना महाराष्ट्रापुरतं मर्यादित न ठेवण्याचा आग्रह!