ठाणे : राज्याचे वनमंत्री आणि पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक (Ganesh Naik) यांनी ठाण्यातील पाचपखाडी परिसरात वंदे मातरम माघी गणेशोत्सव मंडळात गणरायाची आरती केली. यानंतर त्यांनी विविध मुद्यांवर भाष्य केलं. मंत्री गणेश नाईक या ठिकाणी वातावरण प्रसन्न आहे.भविष्यकाळ चांगला आहे. पत्रकारांनी गणेश नाईक यांना ठाण्यात जनता दरबार कधी घेणार असता  ते म्हणाले हे बघा बाब अशी आहे. काल माझी ठाणे जिल्ह्याच्या संपर्कप्रमुख मंत्री म्हणून नेमणूक झालेली आहे. मी पालघरचा पालकमंत्री आहे. प्रश्न असा आहे की जनता दरबार कोणी कुठेही घेऊ शकतो. महायुतीच्या सगळ्याच मंत्र्यांनी जिथे पाहिजे तिथे दरबार घ्या, असं गणेश नाईक म्हणाले.


जनता दरबारामध्ये लोकांच्या अडी अडचणी समजून घेऊन दूर करण हे चांगलंच आहे. मी सगळ्यांना सांगितलं आहे.एकनाथ शिंदे यांच्या सगळ्यां मंत्र्यांना आणि अजित पवार यांच्या मंत्र्यांना देखील नवी मुंबई मध्ये आणि प्रत्येक तालुक्यात अजितदादांच्या लोकांना देखील सांगितलं आहे, असं गणेश नाईक म्हणाले.


शेवटी काय महायुतीचा विचार आहे महाराष्ट्र आता थांबणार नाही.. गतिमान, शक्तिमान, प्रकाशमान.. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार आहेत आणि शेवटी आम्ही पाठीमागे आहोतच, असं गणेश नाईक म्हणाले.


ठाण्यातील वाहतूक कोंडीबाबत विचारलं असता गणेश नाईक यांनी  पालघर मध्ये सगळ्या संबंधित अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती.भाईंदर पासून ते गुजरात बॉर्डर पर्यंत ट्राफिक जाम होते. त्याच्याकरिता वरिष्ठ अधिकारी यांना देखील बोलवलं होतं. एप्रिल - मे पर्यंत तो रस्ता परिपूर्ण होईल, असं सांगण्यात आलं आहे.


गणेश नाईक म्हणाले इथल्या पोलीस अधीक्षकांना यांना सांगितलं की दररोजची वाहतूक कोंडी होत असेल तर लोकांनी कसा काय प्रवास करायचा. तिथेचं मनोहर वाडा रस्त्या संदर्भात संबंधित अधिकारी यांना बोलावलं , होतं. 


ठाणे हे आपल्या सगळ्यांचा आहे. ठाण्यात काय अडीअडचणी आल्या तर संबंधित अधिकाऱ्यांना देखील आपण बोलू, असं गणेश नाईक म्हणाले.  


दरम्यान, काही दिवसांपूर्वी मंत्री गणेश नाईक यांनी ठाण्यात जनता दरबार घेण्याची घोषणा केली होती. त्यावेळी ती चर्चेचा विषय ठरली होती. तेव्हा देखील गणेश नाईक इतर पक्षाच्या नेत्यांनी, मंत्र्यांनी नवी मुंबईत जनता दरबार घ्यावा, अशी भूमिका घेतली होती.


इतर बातम्या : 


Suresh Dhas : दिवार ते बाहुबली सुरेश आण्णा धसांच्या भाषणाची अनोखी शैली, सगळा ब्लॉकबस्टर प्रकार; Special Report


धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत शिंदेंच्या मंत्र्यांची उघडपणे भूमिका; जितेंद्र आव्हाडांकडून अभिनंदन