ठाणे : राज्यातील पाचव्या टप्प्यासाठीचा प्रचार थांबला असून सोमवारी, 20 मे रोजी मतदान होणार आहे. या पाचव्या टप्प्यामध्ये मुंबईतील सहा आणि इतर सात अशा 13 मतदारसंघासाठी मतदान घेण्यात येणार आहे. त्यामध्ये ठाणे आणि कल्याण लोकसभेचा समावेश असून पोलिस आणि प्रशासन सज्ज झालं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे होमग्राऊंड असलेल्या ठाणे लोकसभा मतदारसंघातील नवी मुंबईमध्ये 4 हजाराहून अधिक पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 


ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी मतदान होणार आहे. बेलापूर आणि ऐरोली विधानसभा मतदारसंघात निवडणुकीच्या अनुषंगाने मागील दीड महिन्यापासून नवी मुंबई पोलिसांनी कंबर कसली आहे. निवडणुकीत कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी पोलीस  यंत्रणा सज्ज झाली आहे. 


किती पोलिस बंदोबस्त?


ठाणे लोकसभा मतदारसंघामधील नवी मुंबई परिसरता एकूण 144 वरिष्ठ अधिकारी, 1 हजार 741 अंमलदार, 819 होमगार्ड, एसआरपीएफचे 600 जवान असा एकूण 4 हजारांपेक्षा अधिक फौजफाटा निवडणुकीसाठी सज्ज झाला आहे. नवी मुंबईकरांनी निर्भयपणे मतदान करावं, आपला हक्क बजावा, असं आवाहन पोलिसांनी केले आहे.


दंगल विरोधी पथक तैनात


लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्याचे 20 मे रोजी मतदान असणार आहे. ठाणे, कल्याण, भिवंडीमधील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात मतदानाचा हक्क बजावावा असे आवाहन ठाणे जिल्ह्याचे पोलीस आयुक्त अशितोष डुंबरे यांनी केले आहे.


दरम्यान भिवंडी लोकसभा मतदारसंघ, ठाणे लोकसभा मतदारसंघ आणि कल्याण लोकसभा मतदारसंघात ठाणे पोलीस आयुक्तालयाद्वारा सर्वच ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. रॅपिड फोर्स, ठाणे पोलीस मुख्यालय फोर्स, दंगल विरोधी पथक अशा अनेक पोलिसांच्या तुकड्या मतदानाच्या दिवशी शहरात तैनात करण्यात आले आहेत. 


मुंबईत 22 हजार पोलिस तैनात


बृहन्मुंबई शहरामध्ये कायदा व सुव्यवस्थेच्या अनुशंगाणे मुंबई पोलीस (Police) दलाकडून 5 अपर पोलीस आयुक्त, 25 पोलीस उपआयुक्त, 77 सहायक पोलीस आयुक्त यांच्यासह 2475 पोलीस अधिकारी व 22,100 पोलीस अंमलदार व 03 दंगल काबु पथक (RCP) बंदोबस्तकामी तैनात करण्यात आलेले आहेत. 


आत्तापर्यंत 8088 प्रतिबंधक कारवाई


लोकसभा निवडणूक 2024 च्या अनुषंगाने आचारसंहिता लागू झालेच्या म्हणजेच 16 मे पासून आजपर्यंत विविध कायद्याअंतर्गत मुक्त आणि निष्पक्ष निवडणुक पार पाडण्याकरीता एकुण 8088 प्रभावीपणे प्रतिबंधक कारवाई करण्यात आलेली आहे. लोकसभा निवडणूकीच्या अनुषंगाने फौ.दं.प्र.सं. कलम 144 अन्वये15 मे पासून मुंबई पोलीसांकडून आदेश प्रसारीत करण्यात आले असून मतदान केंद्रांच्या 100 मीटर परीघात (मतदान केंद्र परिसर)आणि मतदान केंद्राच्या आत मोबाईल फोन बाळगता येणार नाही. 


ही बातमी वाचा: