एक्स्प्लोर

Dilip Mane: काल रात्री फडणवीसांची भेट घेतली अन् आज सोलापूरच्या माजी आमदारांची भाषाच बदलली, म्हणाले, 'हर्षवर्धन सपकाळांना मी कोण हे माहिती तरी आहे का?'

Dilip Mane: देवेंद्र फडणवीसांच्या भेटीनंतर माजी आमदार दिलीप माने यांनी पक्षातरांचं कारण त्याचबरोबर सर्व गोष्टींवर सविस्तरपणे भाष्य केलं आहे.

सोलापूर: सोलापुरचे पालकमंत्री जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांनी आगामी महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांपूर्वी मोठा राजकीय धमाका केला आहे. काल (गुरुवारी) रात्री जिल्ह्यातील चार माजी आमदारांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत वर्षा निवासस्थानी बैठक झाल्याची माहिती समोर आली आहे. या हालचालींमुळे जिल्ह्यातील राजकारणात चांगलीच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, मित्रपक्ष असलेल्या अजित पवार गटालाही गोरे यांनी अप्रत्यक्ष झटका दिल्याचं बोललं जातं. दिवाळीपूर्वी किंवा दिवाळीच्या काळात या नेत्यांचा भाजप प्रवेश सोहळा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी या वृत्ताला दुजोरा दिला असून, “जिल्ह्यातील अनेक बडे नेते भाजपमध्ये प्रवेशाच्या वाटेवर आहेत,” असे संकेत त्यांनी दिले आहेत. दरम्यान देवेंद्र फडणवीसांच्या भेटीनंतर माजी आमदार दिलीप माने यांनी पक्षातरांचं कारण त्याचबरोबर सर्व गोष्टींवर सविस्तरपणे भाष्य केलं आहे. (Jaykumar Gore)

Dilip Mane: बाजार समितीच्या निवडणुकीच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात आलो

माजी आमदार दिलीप माने म्हणाले, मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत काल भेट झाली. याआधीच जयकुमार गोरे, सचिन कल्याणशेट्टी यांच्यासोबतही आधीच भेट झालेली. परवा आम्हाला निरोप आला होता. राजन पाटील, यशवंत माने, बबनदादा यांच्या मुलांना निरोप होता. पुढच्या निवडणुकाबाबतीत चर्चा झाली. या आधी देखील आमच्या भेटी झालेल्या होत्या. मी वैयक्तिक माझ्या बाबतीत सांगतोय. माझ्याबाबतीत विधानसभा निवडणुकीत काय झालं हे पाहिलं. पण त्यानंतर मला दिल्ली किंवा स्थानिक पातळीवर काहीही विचारले गेले नाही. बाजार समितीच्या निवडणुकीच्या माध्यमातून आम्ही मुख्यमंत्री महोदयांच्या संपर्कात आलो. त्यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील अनेक विकास कामे होताना दिसत आहेत. विमानसेवा सुरु झाली, आयटी पार्क देखील होतोय असंही  दिलीप माने यांनी म्हटलंय.

Dilip Mane: माझं सहकार्य राहिलं असं मुख्यमंत्री यांनी आश्वासन दिलं

आम्ही विरोधी पक्षात ही नीट नाही, सत्ताधारीमध्ये देखील नाहीये. निवडणुका तोंडावर आहेत, त्यामुळे आम्ही शांत कसे राहायचं. कार्यकर्ते सातत्याने विचारणा करतायत पुढची भूमिका काय करायचं. त्यामुळेच कार्यकर्त्यांनी सांगितलं तुमची काम होतायत, मुख्यमंत्री सोबत आहेत, जयकुमार गोरे आणि  सचिन कल्याणशेट्टी यांची भूमिका रास्त वाटली. माझ्या मतदारसंघातील माझी काय स्थिती आहे या बाबतीत मी सांगितलं. माझं सहकार्य राहिलं असं मला मुख्यमंत्री यांनी आश्वासन दिलं आहे. आता कार्यकर्त्यांशी चर्चा करू त्यानंतर आमचा निर्णय मुख्यमंत्री फडणवीसांना कळवू. बबनदादाचे चिरंजीव हे देखील त्यांचा वडिलांना विचारूनच त्या ठिकाणी आले होते अशी माहिती मानेंनी दिली.

Dilip Mane: हर्षवर्धन सपकाळ यांना दिलीप माने कोण हे माहिती देखील नसावं

त्याचबरोबर मुख्यमंत्री फडणवीसांना आम्ही सांगितलं सुभाष देशमुख हे प्रतिस्पर्धी आहेत. आम्ही कायम त्यांच्या विरोधात निवडणूक लढवली आहे. मुख्यमंत्री यांनी सांगितलं की तुम्हीच त्यांची काळजी करू नका. आपल्याला पक्ष वाढवायचे आहे, त्यामुळे तुम्हीच इतरांची चिंता करू नका. इतर जे सहकारी सोबत आलेले होते त्यांच्या देखील अडचणी सारख्याच आहेत. मतदारसंघातील काम होतं नाहीयेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना दिलीप माने कोण हे माहिती देखील नसावं. आज ही काँग्रेसची परिस्थिती आलेली आहे. ज्यांच्यासोबत काँग्रेसमध्ये संबंध होते ते आज तिथं पदावर नाहीयेत, अशी खंत आणि पक्षबदलाचं कारण दिलीप मानेंनी सांगितलं आहे. 

मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे शिक्षण घेतलेलं असून एबीपी माझामध्ये मागील 9 वर्षांपासून कार्यरत आहे. मुंबईत assistant प्रोड्यूसर म्हणून काम केल्यानंतर मागील 7 वर्षांपासून सोलापूर जिल्हा प्रतिनिधी पदावर कार्यरत.

Read More

महत्त्वाच्या बातम्या

गद्दारांना कोणताही युक्तिवाद नसतो, तो फुटीर गट, शिवसेना पक्ष सुनावणीवरुन राऊतांचा जोरदार प्रहार 
गद्दारांना कोणताही युक्तिवाद नसतो, तो फुटीर गट, शिवसेना पक्ष सुनावणीवरुन राऊतांचा जोरदार प्रहार 
Vishakha Raut : विशाखा राऊत यांचे नगरसेवकपद धोक्यात? शिंदेसेनेच्या सदा सरवणकरांच्या पराभूत लेकीला नगरसेवकपदाची लॉटरी लागणार? 
विशाखा राऊत यांचे नगरसेवकपद धोक्यात? शिंदेसेनेच्या सदा सरवणकरांच्या पराभूत लेकीला नगरसेवकपदाची लॉटरी लागणार? 
Tarique Rahman India Visit: बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
Tukaram Mundhe: राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!

व्हिडीओ

Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha
Anganwadi Sevika : पोषण आहाराचं वास्तव, अन्याय कारवाईचा विस्तव | Special Report ABP Majha
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News
Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Swati Khanna : लंडनमध्ये शिक्षण, दिल्ली हायकोर्टात वकिली, राहुल गांधींसोबत संसदमार्ग पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, कोण आहेत स्वाती खन्ना?
 राहुल गांधी आणि साहिलसोबत ठिय्या आंदोलनात दिवसभर उपस्थिती, वकील स्वाती खन्ना कोण आहेत?
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
Rahul Gandhi : साहिलच्या शरीरात छर्रे, आठ तासानंतर एफआयआर दाखल, गृहसचिव आणि अमित शाह यांना अंतिम परवानगी द्यावी लागली, राहुल गांधी यांचा दावा
साहिल लोचब याच्यासोबत आठ तास ठिय्या, एफआयआर दाखल होताच राहुल गांधी म्हणाले, न्यायाच्या दिशेनं पहिलं पाऊल
Nashik Road Issue : नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, रस्त्यांच्या दर्जाचा प्रश्न ऐरणीवर, पाहा Video
नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, Video व्हायरल
Tarique Rahman India Visit: बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
Tukaram Mundhe: राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
Sugar Price Hike : साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड दोन कारणं सांगत म्हणाले...
साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दोन कारणं सांगितली
Embed widget