भंडारा : शेतकऱ्यांच्या (Farmers) समस्यांबाबत वारंवार सरकारकडे पाठपुरावा करण्यात येत आहे. मात्र, भाजप सरकारकडून सातत्यानं शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडं दुर्लक्ष होत आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यात भाजप सरकार (BJP Government) अपयशी ठरले आहे. अधिवेशनात प्रश्न न सोडविल्यास भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देणार, असा इशारा देत भाजपचे माजी खासदार शिशुपाल पटले (Shishupal Patle) यांचा भाजपला (BJP) घरचा आहेर दिला आहे. 


महागाई, बेरोजगारी, विजेचे अवास्तव वाढलेले दर, यामुळं सर्वसामान्य नागरिकांना जगणं कठीण झालं आहे. उत्पादक खर्चाच्या तुलनेत शेतकऱ्यांना मिळणारा दर आणि वारंवार नैसर्गिक आपत्तीत होणारं नुकसान यामुळं शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतकऱ्यांच्या समस्यांचा वारंवार सरकारकडं पाठपुरावा करण्यात येत आहे. मात्र, भाजप सरकारकडून सातत्यानं शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडं दुर्लक्ष होत आहे. 


...तर प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देणार


यामुळेच भाजप सरकारला लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election 2024) फटका बसला. शेतकरी, बेरोजगार, सर्वसामान्य नागरिक यांच्या प्रश्नांवर राज्य सरकारनं सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात तोडगा काढून सर्व प्रश्न तातडीनं सोडवावित, अन्यथा भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देण्याचा इशारा भाजपचे माजी खासदार आणि किसान आघाडीचे प्रदेश सरचिटणीस शिशुपाल पटले यांनी भाजपला दिला आहे.


शिशुपाल पटले यांचा भाजपला घरचा आहेर 


शिशुपाल पटले यांनी म्हटले आहे की, नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये प्रोत्साहन राशी देण्याची महाराष्ट्र सरकारची घोषणा हवेतच आहे. उन्हाळ्यात रब्बी पिकाची जे नुकसान झालं त्याची अद्याप भरपाई मिळालेली नाही, पीक विम्याचे पैसे मिळालेले नाहीत. जिल्ह्याचे पालकमंत्री विजयकुमार गावित (Vijaykumar Gavit) यांना भेटलो. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना भेटलो त्यांना या सर्व संबंधात निवेदने दिली आहेत. पाच वर्षापासून शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवर सातत्यानं सरकारकडं पाठपुरावा करतोय. मात्र त्यावर भाजप सरकार गंभीर नाही. जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी मी हे पाऊल उचलत आहे. या समस्यांचा तोडगा निघत नसल्याने विधानसभेत आम्ही जनतेपुढे कुठल्या तोंडाने जाणार, असे म्हणत शिशुपाल पटले यांना भाजपला घरचा आहेर दिला आहे.  


इतर महत्वाच्या बातम्या 


विधानपरिषद निवडणुकीत 12 पैकी 11 उमेदवारांचा विजय निश्चित, पराभूत होणारा एक उमेदवार कोण?, समजून घ्या राजकीय गणित!


Vidhan Parishad Election 2024: विधानपरिषद सभापतीपदाच्या निवडणुकीत ट्विस्ट येणार? अवघे 4 सदस्य असणाऱ्या अजितदादा गटाने शड्डू ठोकला