Uddhav Thackeray on Raj Thackeray : महाराष्ट्रामध्ये पाच टप्प्यातील लोकसभा निवडणुकीसाठी आज (18 मे) प्रचाराची सांगता आज होत असल्याच्या पार्श्वभूमीवर इंडिया आणि महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद आज मुंबईमध्ये ग्रँड हयात हॉटेलमध्ये पार पडली. या पत्रकार परिषदेला उद्धव ठाकरे, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, यांच्यासह इंडिया आणि महाविकास आघाडीतील नेते उपस्थित होते. या पत्रकार परिषदेला उद्धव ठाकरे, मल्लिकार्जुन खरगे, शरद पवार यांनी संबोधित केले. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि मोदींवर कडाडून हल्ला चढवला. त्याचबरोबर शिवाजी पार्कवर झालेल्या महायुतीच्या सभेच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी आपले मत व्यक्त केले.
तर मी त्यांच्याकडे का लक्ष देऊ?
या सभेमध्ये राज ठाकरे यांनी पाच मागण्या केल्या होत्या तसेच पंडित नेहरुनंतर मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार असल्याचा दावा केला. राज ठाकरे यांच्या दाव्यावर आणि मागण्यावंर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, मला नाही वाटत नाही की त्यांच्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. मोदींनी त्यांच्याकडे लक्ष दिले नाही, त्यांच्या मागण्यांकडे लक्ष दिले नाही तर मी त्यांच्याकडे का लक्ष देऊ? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.
हिंदू देशभक्त नाहीत, हा शोध कोणी लावला?
दरम्यान उद्धव ठाकरे हिंदू शब्दावरूनही भाजप आणि शिंदेंवर तोफ डागली. ते म्हणाले की, जे लोक देशभक्ती या शब्दावर आक्षेप घेत असतील, तर ते लोक देशद्रोही आहेत. हिंदू देशभक्त नाहीत, हा शोध कोणी लावला? असा सवाल त्यांनी केला. उद्धव ठाकरे म्हणाले की पंतप्रधान महाराष्ट्रात घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना, उपमुख्यमंत्री घेऊन आपल्या हुकूमशाहीचा प्रचार करत आहेत. ते म्हणाले की भाजपच्या मनात अजूनही पाकिस्तान आहे, काहींना अजूनही नवाज शरीफ यांच्या केकची आठवण येते म्हणून सातत्याने त्यांना पाकिस्तान आठवतो, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.
इतर महत्वाच्या बातम्या