Maharashtra Lok Sabha Election Result 2024 : राज्यातील 48 मतदानकेंद्रावर मतमोजणी सुरू झाली असून दुसऱ्या फेरीची मतमोजणी हाती आली आहे. त्याचवेळी पुण्यातील मतमोजणी केंद्रावर एक ईव्हीएम मशिन बंद पडल्याची माहिती हाती येत आहे. त्यामुळे मतमोजणीची प्रक्रिया बंद पडली आहे. तर दुसरीकडे हिंगोलीमध्ये मतमोजणीला सुरूवात व्हायच्या आधीच मशिनमध्ये बिघाडी झाल्याचं दिसून आलं. 


हिंगोलीमध्ये मशिमध्ये बिघाड


हिंगोली विधासभेतिल खड़की बूथ क्रमांक 08 खोली क्रमांक 01 मधील मशीन मध्ये बिघाड झाली आहे. त्यानंतर निवडणूक साहाय्यक अधिकारी यांनी मशीन ताब्यात घेतलं. या मशिनमध्ये एकूण झालेले मतदान दाखवत आहे, पण कुठल्या उमेदवाराला किती मतं पडली हे मात्र दाखवत नाही. त्यामुळे सर्व मतमोजणी झाल्यानतंर या मशिनमधील बॅलेट पेपर मोजले जाणार आहेत.