Maharashtra Budget 2024 : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा (Monsoon Session 2024) आज दुसरा दिवस असून अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी विधीमंडळात राज्याचा अर्थसंकल्प (Budget 2024) मांडला. या अर्थसंकल्पात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेची’ अजित पवारांनी घोषणा केली. यावरून शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला. आता यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे.

  


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, दादा हे 'वादा'चे पक्के आहेत. अर्थसंकल्प सर्वसमावेशक आहे. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना आहे. तसेच तीन सिलेंडर वर्षाला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेद्वारे आम्ही देणार आहोत. त्यामुळे विरोधक गॅसवर आलेले आहेत, असे त्यांनी म्हटले. 


अडीच वर्ष 'लाडका बेटा' योजना राबवली, त्याचं काय?


लाडकी बहिण योजना राबवली जात आहे. लाडका भाऊ योजना का नाही? अशी टीका उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) केली. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, लाडका भाऊ योजना तर आम्ही केली आहे. 10 हजार रुपये आम्ही देत आहोत. पण त्यांनी तर अडीच वर्ष लाडका बेटा योजना राबवली, त्याचं काय? असा टोला त्यांनी यावेळी उद्धव ठाकरेंना लगावला. 


त्यांना चादरीशिवाय दुसरे काय दिसणार? 


चादर फाटली असल्याने सत्ताधाऱ्यांनी खैरात वाटायला सुरुवात केली आहे, अशी टीका शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केली. यावर एकनाथ शिंदे म्हणाले की, औरंगजेब आणि याकुब मेमनला मनाने ज्यांनी फादर मानले आहे. त्यांना चादरीशिवाय दुसरे काय दिसणार? अशी टीका त्यांनी यावेळी जयंत पाटलांवर केली. 


नेमकं काय म्हणाले होते उद्धव ठाकरे? 


अर्थसंकल्पावर उद्धव ठाकरे म्हणाले की, जनता महाराष्ट्र लुटणाऱ्यांना कधीही माफ करणार नाही. सरकारने लाडकी बहीण योजना आणली, आम्हाला त्याचा आनंद आहे. महिलांसाठी योजना आणल्यानंतरही आजसुद्धा लोंढेच्या लोंढे नोकरीच्या शोधत फिरत आहेत. लेकींची काळजी घेत आहेत, लेकांची काळजी यात नाही, त्यामुळे, लाडका पुत्र योजना त्यांनी आणावी, असे त्यांनी म्हटले होते. 


इतर महत्वाच्या बातम्या 


Maharashtra Budget 2024 : कर्ज फेडण्यासाठी पैसा नाही, नवीन योजनांसाठी कुठून आणणार? भाजपच्या वाटेवर असलेल्या खडसेंनी सरकारला डिवचलं!


''फडणवीसांच्या भाषेत बोलायचं तर, खोटं नेरेटिव्ह पसरवणारं बजेट; अर्थसंकल्पावर ठाकरेस्टाईल टोला