Eknath Shinde, मुंबई : "ठाणे लोकसभा जिंकण्यासाठी त्यांना जंग जंग पछाडले. मात्र, त्यांची पळता भोई थोडी झाली. बाळासाहेबांचे विचार सोडले. त्यामुळेच कोकणाने त्यांची साथ सोडली. आता एकही आमदार कोकणात दिसणार नाही. कोकणात एकही खासदार आला नाही, आता एकही आमदार येऊ देणार नाही; सगळे किल्ले उद्ध्वस्थ झाले", असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंवर टीका केली.


महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर उद्योग आले आहेत


एकनाथ शिंदे म्हणाले, महाविकास आघाडीने बंद पडलेले प्रकल्प, स्टे दिलेले स्पीड ब्रेकर घातलेले प्रकल्प आम्ही सुरु केले. विकासाचे प्रकल्प , कल्याणकारी योजना, लाडकी बहीण सारख्या अनेक योजना आम्ही आणल्या. विकास आणि योजना याची सांगड घालण्याचे काम आम्ही केलं. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर उद्योग आले आहेत. जनता जनार्दन येणाऱ्या काळात आमच्या कामाची पोचपावती देईल. महायुतीचं सरकार, बहुमताचं सरकार मेजोरिटीने महाराष्ट्रात येईल. आम्ही पुन्हा एकदा जनतेची सेवा करण्यास तयार आहोत. आमची दुसरी यादी लवकरच प्रसिद्ध होईल. 


आमचा 47 टक्के स्ट्राईक रेट होता, त्यांचा 40 टक्के स्ट्राईक रेट होता


पुढे बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, महायुतीमध्ये कोणताही वाद नाही. चांगलं वातावरण आपण महाराष्ट्रात पाहातोय. सकारात्मकता आणि हॅप्पीनेस आपण महाराष्ट्रात पाहातोय. महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा लवकरच सुटेल. तुम्हाला सर्व आजच सांगणार नाही. काही बाबी नंतर सांगण्यात येतील. लोकसभा निवडणुकीत मशालीविरुद्ध धनुष्यबाण जिंकलेला आहे. लोकसभेत आम्ही 13 जागा समोरासमोर लढल्या. त्यातल्या आम्ही सात जागा जिंकल्या. आमचा 47 टक्के स्ट्राईक रेट होता, त्यांचा 40 टक्के स्ट्राईक रेट होता. त्यांच्यापेक्षा 2 लाख 60 मत आम्ही जास्त घेतली आहेत. 


लोकसभा निवडणुकीत फेकाफेकी करुन, फेक नेरेटिव्ह करुनही धनुष्यबाण भारी पडला होता. लोकांना फसवून देखील लोकसभा निवडणुकीत आमचा स्ट्राईक रेट उबाठापेक्षा चांगला होता. कामाच्या जोरावर महायुतीचा विधानसभेला स्ट्राईक रेट एकदम सगळ्यात भारी असेल. महायुती सर्वांना चारीमुंड्या चित करेल. या निवडणुकीत आमचे लोक चौकार -षटकार मारतील, असा विश्वासही एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला. 


काँग्रेसचा एक वडपल्लीवार न्यायालयात गेलाय


आम्ही लाडकी बहीण योजना सुरु केली, त्याचवेळी त्यांनी खोडा घातला. ते कोर्टात गेले होते, हायकोर्टाने त्यांना चपराक दिली होती. काँग्रेसचा एक वडपल्लीवार न्यायालयात गेलाय. लाडकी बहीण योजना महाविकास आघाडीच्या पाटात सलतीये. त्यांच्या डोळ्यात खुपत आहे. त्यांना आता जनता साथ देणार नाही. कोणीही माई का लाल आला तरी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. त्याचे पैसे वाढत जातील. योजना बंद पाडण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांना लोक खाली बसवतील, असंही एकनाथ शिंदे म्हणाले. 


इतर महत्त्वाच्या बातम्या 


पुण्यात टेम्पोत सोनं,कुठून आलं-कुठे निघालं, पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती; IT विभागाचे अधिकारीही दाखल