एक्स्प्लोर

Eknath Shinde : पाणी की तरह ये दोस्ती हमारी कोई भी कोई कितना भी चाहे जुदा नही होंगे, एकनाथ शिंदेंचं देवेंद्र फडणवीसांसोबतच्या मैत्रीवर शायरीतून भाष्य

Eknath Shinde : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानपरिषदेत देवेंद्र फडणवीसांसोबतची मैत्री पाण्यासारखी असल्याचं म्हटलं.

मुंबई :  एकनाथ शिंदे यांनी विधानपरिषदेत सभागृह नेते म्हणून विधिमंडळ अधिवेशनातील अंतिम आठवडा प्रस्तावावर भाषण केलं. यावेळी एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतची मैत्री पाण्यासारखी आहे, कोणी किती प्रयत्न केले तरी आम्ही वेगळे होणार नाही, असं म्हटलं. एकनाथ शिंदे यांनी भाषण करताना शायरी देखील केली. 

देवेंद्र फडणवीसांसोबतची मैत्री पाण्यासारखी

मी आपल्याला एवढंच सांगतो देवेंद्रजी आणि आम्ही आमच्यामध्ये किती काही तुम्ही काय प्रयत्न घालायचा प्रयत्न केला तरी काय होणार नाही. आमचा अजेंडा काय आहे, या महाराष्ट्राला पुढे नेणं, या महाराष्ट्राचा विकास करणं. या महाराष्ट्राची प्रगती करणं या सर्वसामान्य लोकांच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस आणण हे आमचं काम आहे.मी सांगतो "हम वो नही जो दिल तोड देंगे, हम वो नही जो दिल तोड देंगे, थाम कर हात फिर साथ छोड देंगे, पाणी की तरह ये दोस्ती हमारी, पाणी की तरह ये दोस्ती हमारी कोई भी कोई कितना भी चाहे हम जुदा नही होंगे, अशी शायरी करत एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच्या मैत्रीबाबत भाष्य केलं. 

काही लोक आहेत ना मनामध्ये त्यांच्या उकळ्या फुटतात अरे यांच्यामध्ये काहीतरी चालू आहे. काय चालू नाही, आम्ही रोज एकमेकांशी बोलतो. एकमेकाशी संपर्क असतो आमचा कुठे काय झालं कुठे काय करायचं हे सगळं आहे. आमचा अजेंडा स्वार्थ नाही, आमचा अजेंडा परमार्थ आहे. लोकांना मदत करण आमचा अजेंडा आहे, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

मोदी, योगी कोणाला सोडणार नाहीत

अयोध्येत राम मंदिरामध्ये जे झालं त्याचं कोणी समर्थन करू शकत नाही. राम भक्तांना अतिशय वेदना झालेल्या आहेत आणि यावर कठोर चौकशी, कठोर कारवाई होते आहे.मोदीजी आणि योगीजी कुणालाही सोडणार नाही ते जेलमध्ये तुरुंगात खडी फोडायला पाठवल्याशिवाय राहणार नाहीत, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की मी आपल्याला आठवण करू देऊ इच्छितोय की आज जे टीका करता आहेत त्यांच्या सहकाऱ्यांनी सिद्धिविनायकाच्या मंदिरामध्ये दानपेटी लुटण्याच पाप केलं. तेव्हा चौकशीचे आदेश का दिले नाहीत? असा सवाल एकनाथ शिंदे यांनी केला. 

दरम्यान,  एकनाथ शिंदे यांनी गोंधळलेला आणि भरकटलेला असा विरोधी पक्ष या ठिकाणी पाहायला मिळाला. सभागृहामध्ये तुम्ही जरी संख्येने आमच्यापेक्षा कमी असलात तरी सुद्धा भुजबळ साहेब एकटेच होते. सभागृहामध्ये ते लोकांच्या प्रश्नावर आणि समस्यांवर वाचा फोडायचे, असं एकनाथ शिंदे म्हणाले.  

ENBA 2020,2021 पुरस्कार विजेता, अरुण साधू पाठ्यवृत्ती धारक, शोध पत्रकार.  मागील सहा वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत.... 
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कोण संजय राऊत? मी त्यांना ओळखत नाही, शिवराळ भाषेतील टीकेनंतर जयकुमारे गोरेंचा राऊतांना टोला 
कोण संजय राऊत? मी त्यांना ओळखत नाही, शिवराळ भाषेतील टीकेनंतर जयकुमारे गोरेंचा राऊतांना टोला 
Abhijeet Dipke : अमित शाह असताना जर परदेशातून फंडिंग होत असेल तर हे कसले चाणक्य? अभिजीत दिपकेंचा टोला
अमित शाह असताना जर परदेशातून फंडिंग होत असेल तर हे कसले चाणक्य? अभिजीत दिपकेंचा टोला
गावाची ओढ लहानपणापासूनच, मला सरपंच व्हायचं होतं पण... अभिजीत दिपकेंनी माझा कट्ट्यावर सांगितला किस्सा
गावाची ओढ लहानपणापासूनच, मला सरपंच व्हायचं होतं पण... अभिजीत दिपकेंनी माझा कट्ट्यावर सांगितला किस्सा
धाराशिवमध्ये महायुतीत मैत्रीचा नवा अध्याय, भाजपा आमदाराच्या कार्यक्रमात ओमराजेंना मानाचं पान, राणाजगजितसिंहांना डावललं  
धाराशिवमध्ये महायुतीत मैत्रीचा नवा अध्याय, भाजपा आमदाराच्या कार्यक्रमात ओमराजेंना मानाचं पान, राणाजगजितसिंहांना डावललं  
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke : लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
Ajinkya Rahane : निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
Silver Foil On Sweets : मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
PM Modi : आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
Bankipur by-election: बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
Devendra Fadnavis: तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Embed widget