Eknath Shinde, Mumbai : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) तीन दरे गावात दाखल झाले आहेत. एकनाथ शिंदे पुढील तीन दिवसांसाठी त्याच्या गावी मुक्कामी असणार आहेत. दरम्यान, तीन दिवसांच्या मुक्कामी असले तरी बुधवारी (दि.28) ते काही तासांसाठी बुलढाण्याला रवाना होणार आहेत. दरम्यान,  मुख्यमंत्र्यांनी आज मान्सुनपूर्व बैठकीत राज्यातील यंत्रणेला सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान सातारा दौऱ्यावर जाण्यापूर्वी मुख्यमंत्री शिंदेंनी (Eknath Shinde) कोणत्या सूचना दिल्या आहेत. जाणून घेऊयात.. SDRF च्या आठ टीम आहेत त्यांची संख्या वाढवावी. TDRF च्या धर्तीवर महापालिकांनी टीम सुरु कराव्यात. विभागनिहाय SDRF च्या टीम तयार कराव्यात.  दुर्घटना घडल्यानंतर बचावकामी स्थानिक तरूण ताबडतोब जातात त्यांना प्रशिक्षण आणि आवश्यक साहित्य द्यावेत, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दिल्या आहेत. 


486 ठिकाणी दरडप्रवण स्पॉट आहेत


मुंबईमध्ये एमएमआरडीए आणि इतर यंत्रणांच्या अखत्यारीत असलेल्या होर्डिंग्जना मुंबई मनपाचे नॉर्म्स बंधनकारक आहेत. रस्त्यावरील मॅनहोल्सना झाकण आणि गर्डर बसवावे. 486 ठिकाणी दरडप्रवण स्पॉट आहेत. तिथे व्यवस्था करून कायमस्वरूपी व्यवस्था करण्याचे तसेच जलजन्य आजारांवर नियंत्रणासाठी आरोग्य विभागाने औषध गोळ्या यांचा पुरेसा साठा करून ठेवावा असे निर्देश, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिले आहेत.






नद्यांवरील पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करावे


मध्य प्रदेशातील संजय सरोवर, कर्नाटकातील अलमट्टी धरण, तेलंगणातील मेडीगट्टा धरण यांच्याशी संपर्क राखून धोक्याची सूचना आधी मिळेल याची व्यवस्था ठेवावी असे निर्देश दिले. तसेच नद्यांवरील पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करावे असे निर्देश दिले आहेत. प्रशासन, रेल्वे, सैन्यदल, मदत पथके सगळ्यांनी एकत्र येऊन काम केल्यास यंदाचा मान्सून यशस्वीपणे पार पाडणे आपल्याला शक्य होईल असेही शिंदे यांनी यावेळी सांगितले.






इतर महत्वाच्या बातम्या 


Ramdas Athawale : महाराष्ट्रात महायुतीला जोरदार टक्कर आहे, मुंबईत कोणाच्या किती जागा निवडून येणार? रामदास आठवलेंचे बेधडक अंदाज