Eknath Shinde, ठाणे : "ठाण्याला काही गोष्टी सुरू होतात आणि मग त्या सगळीकडे सुरू होतात. मी नेहमी सांगतो, ठाण्यात अधिकारी येतो आणि ठाण्यात आल्यानंतर मोठा होतो. कारण ठाण्याचं एक असं वैशिष्ट आहे", असं वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे.  ठाणे-मुंबई महानगर विकास परिषद 2024 ठाण्यात पार पडली. यावेळी ते बोलत होते. सर्वांना नोकरी,सर्वांना घर, नवीन उद्योग, हरित ठाणे, असं म्हणत शिंदे यांनी बदलत्या ठाण्याचे वर्णन केले. 


एकनाथ शिंदे म्हणाले, एवढी मोठी कॉन्फरन्स ठाण्यात आयोजित केल्याबद्दल धन्यवाद. निती आयोगाचे सुब्रमण्यम यांच्या सोबत बैठक झाली , निती आयोगाने आणि खास करून प्रधांमंत्र्यानी मुंबई एमएमआरचे 1 .3 ट्रिलियन अचिव्ह करण्याचे टार्गेट होतं. 8 सेक्टरमध्ये काम केले तर 1.3 ट्रिलियन पर्यंत पोहोचू शकतो. ठाण्याला काही गोष्टी सुरू होतात आणि मग त्या सगळीकडे सुरू होतात.



एकनाथ शिंदे पुढे बोलताना म्हणाले, प्रधानमंत्र्यांनी सांगितले होतं महाराष्ट्र देशाचे पावर हाऊस होईल इतकं पोटेन्शियल आहे. सरकार बदलल्यावर इंडस्ट्री आले सहा महिन्यात महाराष्ट्र नंबर १ वर आले ही मोठी उपलब्धी आहे. हे सर्व गेम चेंजर प्रकल्प आहेत. 


पालघरला तिसरा एअरपोर्ट करत आहे वाढवण बंदर होत असल्यामुळे दावोसमध्ये मी 1 लाख 37हजार कोटींचे एमओयू साईन केले. गेल्या 2 महिन्यात 2 लाख कोटींचे mou साईन केले आहेत. पुण्यात चाकणमध्ये इंडस्ट्री बाहेर जात आहे, हे कळलं कारण तिथे रस्ता नाही. तिथल्या अधिकाऱ्यांना सांगून रस्ता बनवायला सांगितल नाहीतर मी रोड घेऊन जातो. वेंदाता प्रकल्प गेला म्हणून ओरडत होते प्रधानमंत्री मोदी म्हणाले त्यांना आधीच्या सरकारकडून काहीच मदत मिळाली नाही. आनंद दिघे यांनी ठाण्याच्या विकासाला आधार दिला, असंही एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. 


मुंबई गोवा ॲक्सेस कंट्रोल रस्ता आपण करत आहोत. विकासाच्या कामामध्ये स्पीड ब्रेकर लावणारे नाही तर आपण स्पीड ब्रेकर काढणारे आहोत. 15 वर्ष आपण आंदोलन करून क्लस्टर मंजूर केले आहे. एसआरएचे रखडलेले प्रकल्प सुरू करणार आहोत. 


काही राज्य पर्यटनावर चालतात. फोकस काम करावे लागेल.आपल्याला विकासाच्या कामात आपण स्पिडब्रेकर टाकणारे नाही आहोत. विकासाला चालना देणारे आहोत. कोणाला वाटले ही नव्हते की क्लस्टर होईल. काहींना वाटले की क्लस्टर हे फक्त स्वप्न आहे पण आता त्यांना कळतय, असंही शिंदे म्हणाले. 


इतर महत्वाच्या बातम्या


Atishi CM मै आतिशी... दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी तिसऱ्यांदा महिला; शपथविधीनंतर केजरीवालांचे चरणस्पर्श