Congress Satyagraha: नॅशनल हेराल्ड प्रकरणी चौकशीसाठी ईडीने 26 जुलै रोजी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना समन्स बजावले आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या चौकशी दरम्यान काँग्रेसकडून पुन्हा एकदा आंदोलन करण्यात येणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्यावेळेप्रमाणेच काँग्रेस खासदार संसद भवनात निदर्शने करून पक्ष मुख्यालयात येतील आणि ईडी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा प्रयत्न करतील. नॅशनल हेराल्ड प्रकरणातील चौकशीसाठी अंमलबजावणी संचालनालयाने सोनिया गांधी यांना नवीन समन्स पाठवले होते. त्यानुसार त्यांना 25 जुलैऐवजी 26 जुलैला हजर राहण्यास सांगण्यात आले होते.
यापूर्वी गुरुवारी ईडीने सोनिया गांधी यांची चौकशी केली होती. ही चौकशी सुमारे तीन तास चालली. त्या दिवशीही काँग्रेसकडून जोरदार निदर्शने झाली. काँग्रेसने ईडीच्या या कारवाईला राजकीय सूडभावना असल्याचे म्हटले आणि त्याचा तीव्र निषेध केला. या चौकशीच्या विरोधात काँग्रेस कार्यकर्त्यांनी निदर्शने केल्यानंतर काँग्रेसच्या अनेक नेत्यांना ताब्यात घेण्यात आले.
शांततापूर्ण सत्याग्रह करणार : काँग्रेस
काँग्रेस पक्षाने सर्व कार्यकर्त्यांना 26 जुलै रोजी शांततापूर्ण सत्याग्रह आयोजित करण्यास सांगितले आहे. सर्व खासदार, AICC सरचिटणीस आणि CWC सदस्यांना दिल्लीत होणाऱ्या सत्याग्रहात सहभागी होण्यास सांगण्यात आले आहे. याप्रकरणी ईडीने काँग्रेस खासदार राहुल गांधी यांचीही चौकशी केली होती. त्यादरम्यानही काँग्रेसने रस्त्यावर उतरून निदर्शने केली होती. त्यानंतर काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
इतर महत्वाच्या बातम्या:
ISC Result 2022 Declared: आयसीएसई 12वीचा निकाल जाहीर, ठाण्यातील उपासना नंदी देशात पहिली
Kerala High Court : "अविवाहित मातेचे मूलही देशाचा नागरिक, पालक म्हणून जन्म दाखल्यावर फक्त आईचे नाव लिहिण्याचा अधिकार"
Arvind Kejriwal On Employment : मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची मोठी घोषणा, पाच वर्षात 20 लाख नोकऱ्या दिल्या जाणार