ISC Result 2022 Declared: भारतीय शालेय प्रमाणपत्र परीक्षा परिषद CISCE ने आज संध्याकाळी 5 वाजता ISC इयत्ता 12वीचा निकाल 2022 जाहीर केला आहे. 1 लाखांहून अधिक विद्यार्थी बोर्डाच्या निकालाची आतुरतेने वाट पाहत होते. बोर्डाने आयएससी इयत्ता 12वीचा निकाल जाहीर करण्याच्या वेळेची माहिती प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली होती. ISC 12वीचा निकाल CISCE ने cisce.org, results.cisce.org या अधिकृत वेबसाइटवर जारी केला आहे. विद्यार्थी हा निकाल ओनलाईन पाहू शकतात
ठाण्यातील उपासना नंदी देशात पहिली
महाराष्ट्राचा आयसीएसई बारावी बोर्डाचा निकाल 99.76 टक्के लागला आहे. यात पुन्हा मुलीने बाजी मारली आहे. आयसीएसई 12 बोर्ड परीक्षेत 99.52 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. तर 99.26 टक्के मुले उत्तीर्ण झाले आहेत. देशभरातून 96940 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. देशातील 18 विद्यार्थी 99.75 टक्के गुण मिळवत पहिल्या क्रमांकावर आहे. ठाण्याच्या सिंघानिया शाळेची उपासना नंदी या 18 विद्यार्थ्यांसोबत देशात पहिली आली आहे.
How to Check ISC Result 2022: निकाल कसा तपासायचा
- सर्वात आधी बोर्डाच्या अधिकृत वेबसाइट cisce.org वर जा.
- होम पेजवर 'ISC निकाल 2022' या लिंकवर क्लिक करा.
- आता इंडेक्स नंबर, UID आणि कॅप्चा कोड सारखी लॉगिन क्रेडेन्शियल्स एंटर करा.
- तुमचा 'ISC वर्ग 12वी निकाल 2022' स्क्रीनवर उघडेल.
- ते तपासा आणि डाउनलोड करा.
- पुढील संदर्भासाठी तुम्ही गुणपत्रिकेची प्रिंटआउट घेऊ शकता.
दरम्यान, CISCE ने 17 जुलै रोजी ICSE इयत्ता 10वीचा निकाल जाहीर केला होता. निकाल जाहीर होण्याच्या एक दिवस अगोदर बोर्डाने निकालाची तारीख आणि वेळेची माहिती दिली होती. यंदा 99.97 टक्के विद्यार्थी दहावीत उत्तीर्ण झाले आहेत. मुलींनी पुन्हा एकदा मुलांवर मात केली आहे. यामध्ये 99.98% मुली आणि 99.97% मुले उत्तीर्ण झाली. ICSE 10वीचा निकाल 2022 17 जुलै 2022 रोजी रविवारी संध्याकाळी 5 वाजता घोषित करण्यात आला होता.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- कुठल्या राज्यात MBBSच्या किती जागा? महाराष्ट्रात किती? श्रीकांत शिंदे, हीना गावितांच्या प्रश्नावर केंद्राकडून आकडेवारी जारी
- CBSE Board Exam 2023 Date : CBSE च्या पुढल्या वर्षीच्या परीक्षा 15 फेब्रुवारीपासून; बोर्डाकडून तारीख जाहीर
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI