Gujarat Election 2022: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गुरुवारी दिल्ली विधानसभेत मोठा दावा केला आहे. केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग (Central Bureau of Investigation-CBI) उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या निवासस्थानावर छापे टाकल्यानंतर गुजरातमध्ये आम आदमी पक्षाच्या (AAP) मतांची टक्केवारी चार टक्क्यांनी वाढल्याचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी विधानसभेत सांगितले. यादरम्यान मुख्यमंत्री केजरीवाल म्हणाले की, खोटे प्रकरण करून भाजपला काय मिळते? तुम्ही देशाचा वेळ वाया घालवत आहात. होय, मनीष सिसोदिया यांच्यावर छापा टाकल्यापासून गुजरातमध्ये आमची मतांची टक्केवारी 4 टक्क्यांनी वाढली आहे. अटक केली तर 6 टक्के मते आणखी वाढतील.



केजरीवाल यांनी दावा केला की, "सीबीआयने सिसोदिया यांच्या निवासस्थानावर छापा टाकला, त्यांच्या गावात जाऊन त्यांच्या बँक लॉकरची झडती घेतली. सीबीआयचे लोक म्हणतात की त्यांना सिसोदिया यांच्या विरोधात काहीही सापडले नाही. परंतु त्यांना अटक करण्यासाठी त्यांच्यावर दबाव आहे.” ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकनिष्ठतेचे प्रमाणपत्र दिले आहे.




आप पक्षात शिक्षित आणि आयआयटी पदवीधारक


भारतीय जनता पक्षाची (BJP) खिल्ली उडवत केजरीवाल म्हणाले की, भाजप नेत्यांनी आप आमदारांना विकत घेण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांच्या एकाही आमदाराने त्यांची ऑफर स्वीकारली नाही. केजरीवाल म्हणाले, "पूर्णपणे भ्रष्ट पक्षात शिक्षित लोकांची कमतरता आहे. तर कट्टर प्रामाणिक (आपमध्ये) पक्षात सुशिक्षित, आयआयटी पदवीधारक आहेत.


 केजरीवाल म्हणाले की, ते आमदारांना विकत घेण्यासाठी 20-50 कोटी खर्च करत आहेत. मला शाळा आणि रुग्णालये बांधायची असतील तर मी काही चुकीचे करत आहे का? दरम्यान, दिल्लीतील भाजपचे ऑपरेशन लोटस अयशस्वी झाल्याचे सांगण्यासाठी आप सरकारने सोमवारी विधानसभेत विश्वासदर्शक ठराव आणला. आम आदमी पक्षाने हा विश्वासदर्शक ठराव 58 मतांनी जिंकला.