Dilip Patil on Kolhapur Loksabha : "मुस्लिम संघटनांचा शाहू महाराजांना (Shahu Maharaj) पाठिंबा घेत आहेत. एम आय एम, ऑल इंडिया मुस्लिम लीग,भिवंडीचे आमदार रईस शेख यांनी पाठिंबा दिला. भगव वादळ तयार नष्ट करून कोल्हापूरचा (Kolhapur) भिवंडी तयार करण्याचा  प्रयत्न सुरू आहे. गादीला आम्ही मान देतो. मात्र गादी ने काय करायला पाहिजे ते केले नाही. एकदाही रायगडवरील राज्याभिषेकाला का गेला नाहीत?" मराठा समन्वयक दिलीप पाटलांचे शाहू महाराजांना सवाल" असा सवाल मराठा समाज समन्वयक दिलीप पाटील यांनी शाहू महाराजांना केला आहे. ते कोल्हापुरात बोलत होते. 


दिलीप पाटील म्हणाले, वारसदारांकडून मोठे पाप होत आहे. पन्हाळा गडाची विशाळ गडची पडझड झाली,अतिक्रमण झाले तिथे तुम्ही काय केलं? जिथे महाराज राहिले तिथे तुम्ही काय करू शकत नाहीत. सामाजिक सलोखा म्हणून हिंदूंवर अन्याय करणार आणि ठराविक जणांचे लांगून लाचन करत आहात. आम्हाला निवडणुकीचे देणेघेणे नाही.  कोल्हापूरचे हिरवेकरण सुरू आहे, याला विरोध आहे, असेही दिलीप पाटील यांनी सांगितले. 


कोल्हापुरात शाहू महाराज वि. संजय मंडलिक 


कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात शाहू महाराज छत्रपती वि. विद्यमान खासदार संजय मंडलिक यांच्यामध्ये सामना रंगणार आहे. शाहू महाराजांना काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिली आहे. तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने पुन्हा एकदा संजय मंडलिक यांना मैदानात उतरवले आहे. मात्र, यावेळी संजय मंडलिकांसमोर मोठे आव्हान असणार आहे. कारण गेल्यावेळी ज्यांनी मंडलिक यांच्या विजयासाठी जीवाचं रान केलं, ते काँग्रेस नेते सतेज पाटील आता विरोधात आहेत. कोल्हापुरात सेनेचा विद्यमान खासदार असतानाही उद्धव ठाकरेंनी ही जागा काँग्रेस पक्षाला सोडली आहे. तर त्याबदल्यात सांगलीची जागा खेचल्याची चर्चा आहे. 


2019 मध्ये महाडिकांचा पराभव 


2019 च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या संजय मंडलिक यांनी राष्ट्रवादीच्या धनंजय महाडिक यांचा पराभव केला होता. धनंजय महाडिक यांना अंतर्गत गटबाजीचा फटका बसला होता. तर महाविकास आघाडीतील काँग्रेस नेते सतेज पाटील यांनीही आमचं ठरलंय म्हणत महाडिकांच्या विरोधात प्रचार केला होता. त्यामुळे धनंजय महाडिकांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. मात्र, त्यानंतर धनंजय महाडिक यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. 


इतर महत्वाच्या बातम्या 


Ajit Pawar on Narendra Modi : युक्रेनचं युद्ध थांबवण्यासाठी मोदींनी पुतीनला फोन लावला, हे कुण्या येड्या गबाळ्याचं काम नाही, अजित पवारांकडून कौतुकाचा वर्षाव