Priyanka Gandhi नंदुरबार : सर्व सत्ता, साधन, मोदींकडे  आहे. मग आपण एकटे कसे लढत आहेत? पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी गेल्या दहा वर्षात काय केले? जे काँग्रेसने निर्माण केले ते मोदींनी मित्रांना विकले, असा हल्लाबोल काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केला आहे. नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील (Nandurbar Lok Sabha Constituency) काँगेसचे (Congress) उमेदवार गोवाल पाडवी (Gowaal Padavi) यांच्या प्रचारासाठी प्रियांका गांधी यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी त्या बोलत होत्या.


प्रियांका गांधी म्हणाल्या की, आदिवासींसाठी काँग्रेसने अनेक योजना सुरु केल्या.  राहुल गांधी असे नेते आहेत ज्यांनी 4 हजार किलोमीटरची यात्रा केली आहे. काँग्रेसचा पाया गांधी विचारांचा आहे. लोकशाहीत जनता सर्वोतोपरी असते. पण भाजपची विपरीत विचारधारा आहे. आदिवासी संस्कृतीचा आदर भाजप करीत नाहीत, ते संस्कृती बदलण्याचा प्रयत्न करीत आहेत. ज्या वेळी आदिवासींवर अन्याय होतो त्यावेळी भाजप गप्प राहते. आदिवासींचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. भाजपने एकमेव आदिवासी मुख्यमंत्री सोरेन जेलमध्ये पाठवले आहेत. 


भाजपकडून आदिवासींचा सतत अपमान 


मोदी देशातील गरिबांबद्दल बोलतात एक आणि दुसरे करतात. जे केले जाते त्याचा राजकीय फायदा घेतला जात नाही. भाजप सतत आदिवासींचा अपमान करत आहे. देशात 22 लाख आदिवासींना जमीन पट्टे दिले नाहीत. मोदी सांगता सबरीचा पुजारी आहे. पण देशात शेकडो शबरींचा अपमान केला जातं आहे, तेव्हा मोदी का? गप्प राहतात, असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे. 


इंदिरा गांधींकडून काहीतरी शिका  


कुठे शबरी आणि कुठे मोदीमच्या पोकळ गप्पा? कुस्तीपटू न्याय मागत असताना, मोदी गप्प होते, त्यामुळे कुठे राम आणि कुठे मोदी? अत्याचारींना तिकीट दिले गेले. सर्व सत्ता, साधन, मोदींकडे  आहे. मग आपण एकटे कसे लढत आहेत? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या दहा वर्षात काय केले? हे सांगण्याची हिंमत त्यांच्यात नाही. त्यांना हिंमत हवी असेल तर त्यांनी इंदिरा गांधींकडून शिकावं. इंदिरा गांधींनी पाकिस्तानचे देखील दोन तुकडे केले, अशी हिंमत दाखवा. त्यांच्याकडून काहीतरी शिका, असा हल्लाबोल त्यांनी यावेळी पंतप्रधान मोदींवर केला. 


आम्ही मोदींप्रमाणे सत्ता बदल करणार नाही


गरिबांकडे अनेक समस्या आहेत. त्यांच्याकडे मोदी स्वतःच्या समस्या मांडतात. मोदी यांचा संपर्क जनतेशी तुटला आहे. त्यांचे नेतेच त्यांना घाबरतात. देशातील गरीब खचला आहे, त्याला उत्पन्न मिळत नाही. शेती करणे कठीण झाले आहे. पण मोदींना हे कळत नाहीत. त्यांना कोण सांगण्याची हिंमत करीत नाही. गेल्या दहा वर्षात मोदींचा एका आदिवासीसोबत फोटो नाही. एकदाही आदिवासी सोबत आले नाहीत. मोदींनी देशात सत्तेसाठी राजकारण केले जाणारी व्यवस्था निर्माण केली आहे. महाविकास आघाडीचे सरकार पाडले. पैसे देऊन लोकशाही विरोधात सत्तांतर केले. आम्ही मोदींप्रमाणे सत्ता बदल करणार नाही. मोदींनी देशाची संपत्ती सर्व श्रीमंत मित्रांना देऊन टाकली.


काँग्रेसची गॅरंटी, सर्व आश्वासन पूर्ण करणार 


जे काँग्रेसने निर्माण केले ते मोदींनी मित्रांना विकले. मोदी राज्यात मोठ्या उद्योपतींचे 16 लाख करोडचे कर्ज माफ केले. जोवर आवाज बंद होत नाही तोवर बोलणार आहे. सरकार बदलेपर्यंत बोलत राहणार आहे. काँग्रेसची गॅरंटी, सर्व आश्वासन पूर्ण करणार आहे. 25 लाखापर्यंत उपचार मोफत होणार आहेत. परिवारातील सर्वात मोठ्या महिलेच्या खात्यात एक लाख देणार आहोत.  जो पदवीधर आहे त्याला आम्ही नोकरी देणार आहोत. 30 लाख पद भरणार आहोत, अशा घोषणा त्यांनी यावेळी केल्या. 


आणखी वाचा 


अमेठी सोडून राहुल गांधींना रायबरेली मतदारसंघ का निवडला? काय आहे रायबरेलीचा इतिहास?