धाराशिव : धाराशिव परांड्याचे आमदार तानाजी सावंत (MLA Tanaji Sawant) यांच्या विरोधात निवडणूक याचिका दाखल करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माजी आमदार राहुल मोटे (Rahul Mote) यांनी तानाजी सावंत यांच्या निवडीला आव्हान दिलं आहे. औरंगाबाद खंडपठात याचिका दाखलकरण्यात आली आहे. याचिकेत नेमकं काय म्हटलय ते पाहूयात.

तानाजी सावंत यांनी मतदारांना आमिश दाखवण्याचा आरोप या याचिकेत करण्यात आला आहे. तानाजी सावंत यांनी मतदारांना साडी, भांडी, पैसे वाटप केले आहे, याचे पुरावेही जोडले आहेत. याबाबत तानाजी सावंत यांना औरंगाबाद खंडपीठाने नोटीस बजावली आहे. भगीरथ कारखाना तानाजी सावंत यांचे बंधू शिवजी सावंत, क्रांती महिला उद्योग समूहाच्या अर्चना दराडे यांनाही नोटीस देण्यात आली आहे. 

धाराशिव जिल्ह्यातील परंडा विधानसभा मतदारसंघ हा एक महत्वाचा मतदारसंघ मानला जातो. या मतदारसंघाकडे संपर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं. कारण शिवसेना शिंदे गटाचे तानाजी सावंत यांच्या विरोधात शरद पवार गटाचे राहुल मोटे मैदानात होते. शेवटच्या फेरीत तानाजी सावंत विजयी झाले होते. त्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल मोटे यांचा 1509 मतांनी पराभव केला होता.  शिंदेंच्या शिवसेनेने विद्यमान आमदार आणि मंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांना पुन्हा एकदा परांडा विधानसभा मतदारसंघात मैदानात उतरले होते. दरम्यान, तानाजी सावंत यांच्याविरोधात महाविकास आघाडीकडून दोन उमेदवार देण्यात आले आहेत. शरद पवारांच्या राष्ट्रवादीने परांड्यात राहुल मोटे यांना उमेदवारी दिली आहे. तर दुसरीकडे ठाकरेंच्या शिवसेनेने दिवंगत माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांचे पुत्र रणजीत पाटील यांना तिकीट दिलं होतं. त्यामुळे महाविकास आघाडीच्या उमेदवारांपैकी एकानेही माघार घेतली नाही, तर मतदारसंघात तिरंगी लढत होण्याची शक्यता होती. मात्र, रणजीत पाटील यांनी माघार घेत राहुल मोटे यांना पाठिंबा दिला होता. मात्र, अखेर तानाजी सावंत यांनीच बाजी मारली होती.

दरम्यान, या निवडणुकीत परांडा विधानसभा मतदारसंघात पैशांचा मोठ्या प्रमाणात वापर झाल्याची चर्चा आहे. तानाजी सावंत यांनी मतदारांना पैशांसह साडी, भांडी वाटप केल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. त्यामुळं आता तानाजी सावंत यांच्याविरोधात माजी आमदार राहुल मोटे यांनी याचिका दाखल केली आहे. यामुळं तानाजी सावंत यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता देखील वर्तवली जातेय. 

महत्वाच्या बातम्या:

देवेंद्र फडणवीसांचा एक आदेश अन् झटक्यात तानाजी सावंतांचा सरकारी लवाजमा गायब, फक्त एकच सुरक्षारक्षक उरला