Dhananjay Mahadik, Kolhapur : "ज्याने काम केलंय त्यानेच कामाचं श्रेय घ्याव, असा माझा समज आहे. पण आता मी थेट पाईपलाईनच्या कामात लक्ष घालणार आहे. यांनी पाईपलाईनचे उद्घाटन करून पाच महिने झाले पण लोकांना पाणी मिळाले नाही. दिवाळीची आंघोळ जाऊन एकट्यानेच केली. मात्र आज अखेर थेट पाईपलाईनचे पाणी कोल्हापूरकरांना मिळालेले नाही", अशी टीका भाजपचे राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांनी काँग्रेस नेते सतेज पाटील (Satej Patil) यांच्यावर केली. ते कोल्हापुरात बोलत होते. 


धनंजय महाडिक  (Dhananjay Mahadik) म्हणाले, पाईपलाईनचे उद्घाटन करून पाच महिने झाले पण लोकांना पाणी मिळाले नाही. दिवाळीची आंघोळ जाऊन एकट्यानेच केली. मात्र आज अखेर थेट पाईपलाईनचे पाणी कोल्हापूरकरांना मिळालेले नाही. कोल्हापुरातील लोक कळशी आणि घागर घेऊन आंदोलन करताना दिसत आहेत. महापालिकेतील अधिकारी लिकेजचे कारण देतात, अजूनही चित्र स्पष्ट नाही. कोल्हापूरला थेट पाईपलाईनचे पाणी अजूनही मिळत नाही, असे माझे स्पष्ट मत आहे. ते पाणी मिळण्यासाठी आता मी पुढाकार घेणार आहे. थेट पाईपलाईनच्या सर्व कामांना मी भेट देणार आहे, असं महाडिक यांनी नमूद केलं.  


कोल्हापुरात श्रेय घेण्याची खूप लोकांना सवय 


धनंजय महाडिक  (Dhananjay Mahadik) पुढे बोलताना म्हणाले, कोल्हापुरात श्रेय घेण्याची खूप लोकांना सवय आहे. आम्ही या विमानतळाबाबत किती कष्ट घेतले हे जनतेला माहिती आहे. दुसऱ्याने श्रेय किती घ्यायचे हे त्यांचे त्यांनी ठरवावे. वीस वर्षे कोल्हापुरातील विमानसेवा बंद होती. मंत्री असताना देखील त्यांना ते करणे शक्य झाले नाही. विमानतळ परवानगीची फाईल सुद्धा तयार केली नव्हती. फाईल स्वतः मी तयार करून मी पैसे भरून ती जमा केली. शंभर वेळा मी डीजीसीकडे जाऊन परवानग्या आणल्या आहेत. मला आत्मिक समाधान आहे. मला वैयक्तिक आनंद होत आहे की, याचे काम आपण पूर्ण केले, असंही महाडिक म्हणाले. 


महाडिक कधीही सत्तेत येणार नाही, असं यांना वाटत होतं


सतेज पाटलांना वाटत होते की, महाडिक कधीही सत्तेत येणार नाही. विमान हवेतच घिरट्या घालते बास्केट ब्रिज ही संकल्पनाच नाही, अशा पद्धतीने आमच्यावर टीका झाली. मात्र भाजपकडून मी खासदार झाल्यानंतर बास्केटचे काम सुरू झाले. आता गिरट्या घालणारे विमान नाही तर सहा ठिकाणी विमानसेवा कोल्हापुरातून सुरू आहे. अजून पाच ठिकाणी विमानसेवा सुरू होईल. आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरु होईल,  यासाठी माझा प्रयत्न असणार आहे. लोकांना पाणी मिळण्यासाठी जर राज्य किंवा केंद्र सरकारकडून निधी लागणार असेल तर मी त्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचेही महाडिक यांनी स्पष्ट केले. 


इतर महत्वाच्या बातम्या 


Kolhapur Loksabha : स्वाभिमानी जनता संजय मंडलिकांच्या मागे ठामपणे उभी, त्यांनाच उमेदवारी द्या; सीएम शिंदेंकडे मागणी