Bhaskar Jadhav Crying : शिवसेना ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव (MLA Bhaskar Jadhav) यांनी नुकतेच चिपळूण मतदारसंघातील आपले कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना एक भावनिक पत्र (Emotional Letter) लिहिले होते. या पत्रात त्यांनी आपल्या सहकाऱ्यांचे ऋण व्यक्त केले आहे. भास्कर जाधव हे आज चिपळूण येथे कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहे. यावेळी त्यांचे पुत्र विक्रांत जाधव (Vikrant Jadhav) भाषण करत असताना त्यांना व्यासपीठावरच अचानक अश्रू अनावर झाले.


मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या घडामोडींवर भास्कर जाधव प्रकाश टाकणार आहेत. मागील काही दिवसांपासून ज्या घडामोडी घडल्या, त्यामध्ये कार्यकर्त्यांना आपली भूमिका भास्कर जाधव पटवून देणार असल्याचे भास्कर जाधव यांनी पत्रात म्हटले आहे. 


भास्कर जाधवांना अश्रू अनावर


भास्कर जाधव उध्दव साहेबांची (Udhav Thackeray) साथ सोडणार नाहीत. पाठ दाखवून पळणे आमच्या रक्तात नाही, असे विक्रांत जाधव यांनी म्हणताच भास्कर जाधवांना अश्रू अनावर झाल्याचे दिसून आले. भास्कर जाधव यांच्याबद्दल माध्यमात सुरू असणाऱ्या बातम्या निराधार आहेत, असेही त्यांनी म्हटले आहे. 


विक्रांत जाधवांची योगेश कदमांवर टीका


तुम्हाला अतिशय लहान वयात संधी मिळाली आहे, तुम्ही नम्रपणे वागायला शिकलं पाहिजे. योगेश कदम आपण पहिल्यांदा निवडून आलात. भास्कर जाधव साहेब सहा वेळा निवडून आलेत हे लक्षात ठेवा, अशी टीका त्यांनी केली आहे. 


माझ्या वडिलांनी सर्वसामान्य जनतेचे प्रेम कमवले


आजकाल पैसे देऊन सभेला कसे लोक आणले जाता हे तुम्ही सर्व जण बघत आहात. मला आयुष्यात जर काही कमवायचे असेल तर माझ्या वडिलांनी जसे 40 वर्ष तुमच्यासारख्या सर्वसामान्य जनतेचे प्रेम कमवले ते मला कमवायचे आहे. मला दुसरं काहीही नको. प्रामाणिक लोकं पैसे देऊन आणली जात नाहीत. त्यासाठी प्रेम आणि आदर जपावा लागतो. तो 40 वर्ष भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी जपला आहे, तेच प्रेम भास्कर जाधव यांची लढण्याची ताकद आहे, असेही विक्रांत जाधव म्हणाले. त्यांचे भाषण ऐकून भास्कर जाधव हे भावूक झाल्याचे दिसून आले. 


इतर महत्वाच्या बातम्या 


Shivaji Adhalrao vs Dilip Mohite: शिरूरमध्ये आढळरावांचं तिकीट कन्फर्म? अजितदादा गटातील वैर संपवणार? थेट कट्टर विरोधकांच्या घरी पोहचले


यांना लग्नातही बोलावू नये, 35 पुराणपोळ्या खातील आणि नवरा बायकोचं भांडणं लावतील, उद्धव ठाकरेंची फडणवीसांवर अप्रत्यक्ष टीका