Uttam Jankar on Shahajibapu Patil, Karmala : सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील (Shahajibapu Patil ) यांनी धनगर समाजाचे नेते उत्तम जानकर यांच्यावर जोरदार टीका केली होती. जानकरांनी मागितलेला हुंडा ऐकून आम्हाला चक्कर आल्याचे शहाजीबापू म्हणाले होते. दरम्यान शहाजीबापूंच्या टीकेला उत्तम जानकरांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. "सुपारी फुटली मुंबईत, हळद लागली गुवाहाटीत, आता सांगोलाकर मुहूर्त लावतील", असे प्रत्युत्तर उत्तम जानकर यांनी दिले आहे. धैर्यशील मोहिते पाटलांच्या प्रचारार्थ आज करमाळा येथे सभा पार पडली. यावेळी उत्तम जानकर (Uttam Jankar) बोलत होते.  यावेळी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील , आमदार रोहित पवार , माढा लोकसभेचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील , धनगर समाजाचे नेते भूषण होळकर आदी उपस्थित होते .


सांगोलाकर वाट बघतायत तुमचा मुहूर्त लावायला


उत्तम जानकर (Uttam Jankar) म्हणाले, भाजपवाले मला सगळं द्यायला तयार होते, पण मी फक्त माझ्या दहा वर्षाचा हिशोब मागितला.सुपारी फुटली मुंबईत, हळद लागली गुवाहाटीत आणि सांगोलाकर वाट बघतायत तुमचा मुहूर्त लावायला. तुमच्या सांगोल्यात 50 खोके म्हणजे 50 हजारांनी पराभव करणार आहोत, असंही जानकर म्हणाले. काही दिवसांपूर्वी जानकरांनी अजित पवारांनाही टोला लगावला होता. मला अजून पक्षातून काढून टाकलेलं नाही. मी पक्षाचा संस्थापक अध्यक्ष आहे, मीच तुम्हाला पक्षातून काढून टाकेन असं जानकर म्हणाले होते. 


वस्ताद तर सोपा नसतोच , तो नेहमी आपला शेवटचा डाव राखून ठेवतो


रोहित पवार म्हणाले, नारायण पाटील तुम्ही योग्य वस्तादाच्या तालमीत आलात. हे आपले वस्ताद गेली 50 वर्षे भाजप सोबत लढत असून कितीही मोठी ताकद आली तरी ती या वस्तादासमोर टिकली नाही असा टोला लगावला . या वस्तादाने अनेक पैलवान तयार केले. त्यातील एका पैलवानाने पहिली कुस्ती जिंकली. दुसरी कुस्ती जिंकल्यावर आपण फार मोठे झालो असे वाटू लागल्यावर त्यांना आपल्या वस्तादासोबत कुस्ती करायची इच्छा झाली. पण त्या पैलवानाने समजून घ्यावे की साहेबांसारखा वस्ताद तर सोपा नसतोच , तो नेहमी आपला शेवटचा डाव राखून ठेवतो. या निवडणुकीत ज्या ज्या गद्दारांनी वस्तादला सोडले त्या सगळ्यांना चितपट केल्याशिवाय राहायचे नाही, असंही रोहित पवार म्हणाले. 


इतर महत्वाच्या बातम्या 


Nilesh Lanke : सेम टू सेम नावांचा पॅटर्न नगरमध्ये, निलेश लंकेंचा सुजय विखेंवर पलटवार, म्हणाले पैशाच्या बळावर डमी उमेदवार उभा कराल पण...