Dhairyasheel Mane, Kolhapur Meeting : "मागच्या वेळी तुम्ही माझ्यासारख्या तरुणाला संधी दिली. गेल्या दोन वर्षात 8 हजार 200 कोटी रुपयांची कामे करणारा हा धैर्यशील माने आहे. हे सेवेचं व्रत आहे. आई आंबाबाईने हे आमच्या खांद्यावर दिलं आहे. गेल्यावेळी मी महायुतीचा उमेदवार होतो आणि आजही महायुतीचाच उमेदवार उमेदवार आहे. दोन वर्षात 8 हजार कोटींची काम करणारा हा खासदार आहे. मी विचारांशी प्रतारणा केली नाही, गद्दार नाही खुद्दार है हम. रक्ताचे नाही तर विचारांचे वारसदार आहोत", असे हातकणंगले लोकसभेचे महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने (Dhairyasheel Mane)म्हणाले. कोल्हापुरात पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या उपस्थितीत महायुतीची सभा पार पडली. यावेळी माने बोलत होते. 


धैर्यशील माने पुन्हा एकदा दिल्लीवारीला जाणार आहे


धैर्यशील माने म्हणाले, आम्ही असंही धैर्यशील माने यांनी म्हटलं आहे. लग्नाचं कोणाचही असूदेत वाढपी आपला असला पाहिजे. माझ्या तरुण मित्रांना विनंती आहे. धैर्यशील माने पुन्हा एकदा दिल्लीवारीला जाणार आहे. पुन्हा एकदा सेवेची संधी द्या, असंही धैर्यशील माने यांनी म्हटलं. कोल्हापूर आणि हातकणंगलेमधील दोन्ही शिलेदार 400 पार मध्ये सामील झाले पाहिजेत.  यासाठी आपण एकत्र झालेले आहोत. हा संकल्प गोरगरिब जनतेचा आहे. देशभरातील सामान्य माणसाचा आहे, असंही माने यांनी सांगितले. 


आम्ही भगव्याचे पाईक आहोत


पुढे बोलताना धैर्यशील माने म्हणाले, एका सामान्य कुटुंबात जन्मलेला मुलगा कोणतीही पार्श्वभूमी नसताना आपल्या वाणीने संपूर्ण देश एकसंघ करतो. जगाचा पाठीवर आपलं वेगळं स्थान निर्माण करतोय. नरेंद्र मोदींनी  देशाला जगभरात लौकिक प्राप्त करुन दिलं. आम्ही भगव्याचे पाईक आहोत. मोदी साहेबांचे हात बळकट करण्यासाठी आम्ही एकनाथ शिंदे साहेबांसोबत वारीमध्ये सहभागी झालो आहोत. मी चांगला आहे, त्यांच्यापेक्षा चांगलं काम करेन म्हणून मी मत मागितली. मी उद्याच्या येणारी पाहट रचनात्मक विकासाची असली पाहिजे, असंही माने यांनी नमूद केलं. 


संजय मंडलिक म्हणाले, कोट्यावधी लोकांसाठी योजना राबवल्या. भारतासारख्या देशात मोदींनी अमुलाग्र बदल घडवले. 3 राष्ट्रीय महामार्गाचे काम वेगाने सुरु आहे. कोल्हापूरचे प्रश्न मी संसदेत उपस्थित केले. आमच्या नेत्यांच्या पाठबळावर राज्य शासनावर 800 कोटींपेक्षा जास्त निधी उपलब्ध करुन दिला आहे. कोरोना काळात प्रत्यक्ष कामावर उतरलो होतो. या मतदारसंघात विरोधी उमेदवारांचे प्रवक्ते जास्त बोलतात. काँग्रेसची भ्रम निर्माण करण्याची जुनी खोड आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या 


''महाराष्ट्रात करोडो रुपयांना आमदारांची खरेदी, तुमच्या डोळ्यादेखत पक्षांतर''; प्रियंका गांधींचा मोदींवर घणाघात