एक्स्प्लोर

फडणवीस म्हणाले, नाहीतर तुम्हीच माझं नाव बदला; सोलापूरला वाढवण बंदराशी जोडणार, लवकरच आयटी पार्कही सुरू होणार

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाचे शिल्पकार येथील जनता आहे, त्यांनतर पालकमंत्री जयकुमार गोरे आणि त्यानंतर आमदारांची फौज आहे.

सोलापूर : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आज सोलापूर जिल्हा दौऱ्यावर असून बार्शी येथील श्री भगवंत प्रकट दिनाच्या निमित्ताने त्यांनी महापूजा केली. त्यानंतर, सोलापूर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार व कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना त्यांनी सोलापूर जिल्ह्याचं अध्यात्मिक महत्त्व आणि विकासासंदर्भाने भाषण केलं. पंढरपूरला देशभरातून भाविक दर्शनसाठी येत असतात, त्यामुळे केवळ पंढरपूर नाही तर जिल्ह्याचं रुप बदलेल असा विकास करू, सोलापूरला (Solapur) वाढवण बंदराशी जोडण्याचं काम आम्ही करणार आहोत, असे म्हणत लवकरच येथे आयटी पार्कही सुरू होणार असल्याचं फडणवीसांनी म्हटलं. उजनीच्या पाण्याचं बाष्पीभवन थांबवण्यासाठी देखील आपण काम करतोय, अशी माहितीही त्यांनी दिली. तर, पंढरपूर कॉरिडोअरसंदर्भात व्यापाऱ्यांना विश्वास देत, तुमचा धंदा 10 पट वाढेल असेही त्यांनी म्हटलं.  

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाचे शिल्पकार येथील जनता आहे, त्यांनतर पालकमंत्री जयकुमार गोरे आणि त्यानंतर आमदारांची फौज आहे. या सगळ्यांनी मिळून हा विजय खेचून आणलाय, हा विजय विकासाचा विजय, विकासाच्या मुद्यावर ज्यांचा विश्वास त्यांचा विजय आहे. निवडून आलेल्या लोकप्रतिनिधीना सांगतो की, अनेकांना वाटतं माझ्यामुळेच मी निवडून आलो, त्यामुळे त्यांचा व्यवहार बदलत जातो. लोकं जसा तुमचा विकास पाहतात तसा तुमचा व्यवहारही पाहतात. एकवेळ विकास कमी चालेलं पण व्यवहार लोकं जास्त लक्षात ठेवतात, एखादं काम होणार नसेल तरी लोकं म्हणतात आमच्याशी कसा वागतो, असे म्हणत काही लोकप्रतिनिधींना चिमटेही काढले. भाजपची परीक्षा ही मोदींनी कामे केलं यावर होणार आहे, पण स्थानिक व्यवहारावरुनही होणार आहे. आम्ही भ्रष्टाचार खपवून घेणार नाही, एखाद्याचा पद गेलं तरी चालेल, चांगल्या कामाशी देवाभाऊ पाठीशी पण चुकलात तर चुकीला माफी नाही, असेही फडणवीसांनी सोलापुरातील नवनिर्वाचित सदस्यांना ठणकावून सांगितलं. 

लवकरच आयटी पार्क सुरू करू - फडणवीस

सोलापूरच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित होता, पण आमचा प्रयत्न आहे याचं वर्षात ते महाविद्यालय सुरु व्हावं. आयटी पार्क घोषणा करून थांबलो नाही. फेब्रुवारीमध्ये आम्ही त्यासाठी जमीन देखील दिली. आता, लवकरच हे आयटी पार्क सुरु करून शिकलेल्या लोकांना इथंच कामं द्यायचा प्रयत्न आहे, असेही फडणवीसांनी म्हटले. 

सोलापुरात आधुनिक रेडिमेड गारमेंट पार्क तयार करू, सोलापूरसाठी पाणी आम्ही आणलं आता प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्यासाठी योजना केली. हे कामं फार अडचणीच असतं, त्यामध्ये आपल्याला खूप लक्ष घालाव लागेल. जेव्हा मतं मागायला जाऊ तेव्हा प्रत्येकाच्या घरात पाणी मुबलक असायला हवं. उड्डाणपूलाच्या बाबतीत केंद्राच्या अडचणी असतील तर आम्ही 15 दिवसात बैठक लावून घेतो. सोलापूरचं एअरपोर्ट आणि त्यावरुन विमानसेवा सुरु झाली. आता नाईट लँडिंग आणि मुंबईला योग्य वेळेत विमान जाईल अशी सुविधा द्यायची आहे, असेही फडणवीसांनी म्हटले. तसेच, ऑपरेटर जो स्लॉट मागेल नवी मुंबई विमानतळावर द्यायची जबाबदारी माझी आहे, असेही त्यांनी सांगितले. 

तर तुम्हीच माझं नाव बदला

महात्मा बसवेश्वर यांनी लोकशाही समजून दिली, त्यांच्या स्मारकासाठी लागेल तो निधी उपलब्ध करून देऊ, पंढरपूरला कॉरीडॉर करतोय, अनेकजण शंका घेत आणि लोकांना घाबरवण्याचे कामं करतायत. पण, मुबलक मोबदला देतोय, ज्यांचं दुकानं त्याना दुकानं, जे योजनेत बसणार नाही त्याना स्पेशल पॅकेज देऊ. आज जो धंदा पंढरपूरमध्ये दुकानदारांचा होतोय, कॉरीडॉर झाला तर धंदा दहापट वाढेल अन्यथा माझं नावं तुम्हीच बदला, असेही फडणवीसांनी म्हटलं. अनेकांना पंढरपूरत यायचं आहे पण व्यवस्था नसल्याने लोकांना येता येतं नाही, केवळ पंढरपूर नाही तर जिल्ह्याचा रूप बदलेल असा विकास करू. सोलापूरला वाढवण बंदराशी जोडण्याचा काम आम्ही करणार आहोत, उजनीच्या पाण्याचं बाष्पीभवन थांबवण्यासाठी कामं करतोय, आजच बार्शीला भगवंताच्या प्रकट दिनानिमित्त जाऊन आलोय. पंढरपूर, तुळजापूर, अक्कलकोट ही महाराष्ट्राची अध्यात्मिक शक्ती या पंचक्रोशीत आहे. सोलापूरकरांचा विश्वास वाया जाणार नाही याचा शब्द देतो, तुमची प्रमाणिक सेवा निवडून आणलेले लोकप्रतिनिधी करतील याचा शब्द देतो, भाजपला ना तुफान थांबवू शकतो ना ऊन हे तुम्ही दाखवून दिलं असे म्हणत विजयी लोकप्रतिनिधींचं कौतुकही मुख्यमंत्र्‍यांनी केलं. 

हेही वाचा

राजेंद्र राऊतांना विधानपरिषदेची लॉटरी लागणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, 'भाजपमध्ये त्यांच्यासारख्या नेत्याची...'

संतापजनक! बँकेच्या एजंटकडून कर्जदार दाम्पत्यास लाथा-बुक्क्यांनी मारहाण, पुण्यात कायदा-व्यवस्थेचे धिंदवडे

मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे शिक्षण घेतलेलं असून एबीपी माझामध्ये मागील 9 वर्षांपासून कार्यरत आहे. मुंबईत assistant प्रोड्यूसर म्हणून काम केल्यानंतर मागील 7 वर्षांपासून सोलापूर जिल्हा प्रतिनिधी पदावर कार्यरत.

Read More

महत्त्वाच्या बातम्या

SC-ST आरक्षणात 'क्रिमी लेयर'चे तत्त्व लागू होत नाही, ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणांना लागू; केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
SC-ST आरक्षणात 'क्रिमी लेयर'चे तत्त्व लागू होत नाही, ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणांना लागू; केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
Gunaratna Sadavarte and Manoj Jarange Patil: 'ठाणे का रिक्षा' म्हटल्यावर एकनाथ शिंदेंच्या आग लागते मग बावनकुळेंविषयी जरागेंनी वापरलेली अपमानस्पद भाषा पटते का? गुणरत्न सदावर्ते कडाडले
'ठाणे का रिक्षा' म्हटल्यावर एकनाथ शिंदेंच्या आग लागते मग बावनकुळेंविषयी जरागेंनी वापरलेली अपमानस्पद भाषा पटते का? गुणरत्न सदावर्ते कडाडले
Sushma andhare: तर शिंदेंना फडणवीस भूमिका घेऊ देतील? मग ते फडणवीस कसले? दोघांच्या कोल्ड वॉरमध्ये जीव मात्र गरीब मराठ्यांचा जातोय; सुषमा अंधारेंचा प्रहार
तर शिंदेंना फडणवीस भूमिका घेऊ देतील? मग ते फडणवीस कसले? दोघांच्या कोल्ड वॉरमध्ये जीव मात्र गरीब मराठ्यांचा जातोय; सुषमा अंधारेंचा प्रहार
Eknath Shinde OBC : जरांगे पाटलांची काल सडकून टीका, आज एकनाथ शिंदेंनी मर्जीतील नेत्याला ओबीसी महाअधिवेशनात धाडलं, मुख्यमंत्र्यांकडूनही 'खास' संदेश!
जरांगे पाटलांची काल सडकून टीका, आज एकनाथ शिंदेंनी मर्जीतील नेत्याला ओबीसी महाअधिवेशनात धाडलं, मुख्यमंत्र्यांकडूनही 'खास' संदेश!

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SC-ST आरक्षणात 'क्रिमी लेयर'चे तत्त्व लागू होत नाही, ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणांना लागू; केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
SC-ST आरक्षणात 'क्रिमी लेयर'चे तत्त्व लागू होत नाही, ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणांना लागू; केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
Sushma andhare: तर शिंदेंना फडणवीस भूमिका घेऊ देतील? मग ते फडणवीस कसले? दोघांच्या कोल्ड वॉरमध्ये जीव मात्र गरीब मराठ्यांचा जातोय; सुषमा अंधारेंचा प्रहार
तर शिंदेंना फडणवीस भूमिका घेऊ देतील? मग ते फडणवीस कसले? दोघांच्या कोल्ड वॉरमध्ये जीव मात्र गरीब मराठ्यांचा जातोय; सुषमा अंधारेंचा प्रहार
Mumbai Local Train: मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये पुरुष प्रवाशाची महिलेला मारहाण, सहप्रवाशी थंडपणे पाहत बसले!
मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये पुरुष प्रवाशाची महिलेला मारहाण, सहप्रवाशी थंडपणे पाहत बसले!
क्लासेस ठरवणार विद्यार्थ्यांनी कोणत्या कॉलेजमध्ये जायचं? ही कुठची शिक्षण पद्धत? क्लासमध्ये आठ-आठ तास गेल्यानंतर कॉलेजमध्ये अटेंडन्स कसा लागतो? राज ठाकरेंकडून शिक्षणातील धंद्याची चिरफाड
क्लासेस ठरवणार विद्यार्थ्यांनी कोणत्या कॉलेजमध्ये जायचं? ही कुठची शिक्षण पद्धत? क्लासमध्ये आठ-आठ तास गेल्यानंतर कॉलेजमध्ये अटेंडन्स कसा लागतो? राज ठाकरेंकडून शिक्षणातील धंद्याची चिरफाड
Chanakya Niti: तुमच्या घरात शांतता टिकत नाही? घरातील वातावरण बिघडवणारी 5 कारणं, चाणक्यनीती सांगते...
तुमच्या घरात शांतता टिकत नाही? घरातील वातावरण बिघडवणारी 5 कारणं, चाणक्यनीती सांगते...
Delimitation Bill: सगळ्या देशाचं लक्ष जेन झी आंदोलनाच्या यशाकडे अन् इकडे मोदी सरकारची मोहीम फत्ते, लोकसभा मतदारसंघ पुर्नरचनेसाठी दोन तृतीयांश मतांची जुळवाजुळव पूर्ण?
सगळ्या देशाचं लक्ष जेन झी आंदोलनाच्या यशाकडे अन् इकडे मोदी सरकारची मोहीम फत्ते, लोकसभा मतदारसंघ पुर्नरचनेसाठी दोन तृतीयांश मतांची जुळवाजुळव पूर्ण?
Mumbai Pune Expressway Missing Link Accident: मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर धडकी भरवणारा भीषण अपघात, कार टेम्पोला धडकली, एकाचा मृत्यू, पाहा भयंकर व्हिडीओ
मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर धडकी भरवणारा भीषण अपघात, कार टेम्पोला धडकली, एकाचा मृत्यू, पाहा भयंकर VIDEO
Raj Thackeray in Nashik press conference: नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी गुजरातचे कंत्राटदार आणले, प्रत्येकाला फक्त आपापल्या कमिशनशी देणंघेणं; राज ठाकरेंची टीका
नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी गुजरातचे कंत्राटदार आणले, प्रत्येकाला फक्त आपापल्या कमिशनशी देणंघेणं; राज ठाकरेंची टीका
Embed widget