Devendra Fadnavis & Abhimanyu pawar in Vidhansabha: विधानसभा निवडणुकीत महायुतीला लाडकी बहीण योजनेमुळे अभुतपूर्व विजय मिळाल्यामुळे ही योजना कायम चर्चेचा विषय असते. सत्ताधारी आणि विरोधक दोघांकडूनही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे या योजनेचा डंका पिटला जातो. महिला कल्याणाचा कोणताही विषय आला की, विषय आपसूकच लाडकी बहीण योजनेकडेच (Ladki Bahin Yojana) वळतो. मात्र, मंगळवारी याच मुद्द्यावरुन सभागृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) काहीसे चिडल्याचे दिसून आले. त्यांनी या मुद्द्यावरुन त्यांचे पूर्वीचे स्वीय सहाय्यक आणि भाजप आमदार अभिमन्यू पवार (Abhimanyu pawar) यांचे कान टोचले. प्रत्येक गोष्टीत लाडकी बहीण आणू नका, लाडक्या बहिणींच्या विरोधात जाऊ नका, अन्यथा घरी बसावे लागेल, असे खडेबोल देवेंद्र फडणवीस यांनी अभिमन्यू पवारांना सर्वांदेखत सुनावले. (Maharashtra Vidhansabha Winter Session 2025 news)

Continues below advertisement

अभिमन्यू पवार यांनी त्यांच्या भागातील अवैध दारुविक्रीचा मुद्दा सभागृहात पोटतिडकीने मांडला. यावेळी त्यांनी म्हटले की, लाडक्या बहि‍णींची सगळ्यात मोठी समस्या अवैध दारु ही आहे. आमच्या महिला भगिनी अवैध दारुविक्रीबाबत (Liquer) विचारणा करतात. आपल्या लाडक्या बहि‍णींचं हे दु:ख आहे. त्यामुळे याबाबत सुधारणा होण्याची आवश्यकता आहे. विधानसभा अध्यक्षांनी याबाबत बैठक घेतली होती. त्यानंतर गृह विभाग, अन्न औषध प्रशासनाला निर्देश देण्यात आले होते. मात्र, विधानसभा अध्यक्षांनी निर्देश देऊनही कारवाई झाली नाही, असे अभिमन्यू पवार यांनी म्हटले.  हे सगळे घडण्याच्या काही मिनिटं आधीच

यावर देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात उत्तर दिले. यावेळी देवेंद्र फडणवीस हे वारंवार सगळ्या विषयांचा संबंध लाडक्या बहिणीशी जोडला जात असल्याने काहीसे चिडले. त्यांनी म्हटले की, अध्यक्ष महोदय मी पुन्हा सदस्यांना सांगतो प्रत्येक गोष्टीत लाडकी बहीण आणू नका. लाडक्या बहिणींच्या विरोधात जाऊ नका. अन्यथा घरी बसावं लागेल.  लाडक्या बहि‍णींचे पैसे सुरु राहतील, ही योजना बंद होणार नाही. त्या योजनेची तुलना दुसऱ्या योजनेशी करता येत नाही, हे लक्षात ठेवा. विधानसभा अध्यक्षांनी काही निर्देश दिले असतील आणि अंमलबजावणी झाली नसेल तर ती आता तातडीने केली जाईल, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

Continues below advertisement

आणखी वाचा

फलटणमध्ये आयुष्य संपवलेल्या डॉक्टर तरुणीच्या मृत्यूबाबत देवेंद्र फडणवीसांकडून महत्त्वाची माहिती, म्हणाले, फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये...